शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

महागाई भत्त्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे धरणे

By admin | Updated: January 15, 2015 22:45 IST

नाशिक : केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही महागाई भत्ता तत्काळ लागू करावा व धुलाई भत्ता मिळावा, याप्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने काल गुरुवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

नाशिक : केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही महागाई भत्ता तत्काळ लागू करावा व धुलाई भत्ता मिळावा, याप्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने काल गुरुवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कासार व राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष महेश आव्हाड यांनी उपस्थित कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. त्यात केंद्र सरकारने जुलै २०१४ पासूनच कर्मचार्‍यांना महागाई भत्ता लागू केला असून, तो राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही लागू करण्यात यावा, अशी भावना सरकारी कर्मचार्‍यांमध्ये असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचार्‍यांना ७ टक्केमहागाई भत्ता तत्काळ देण्यात यावा, तसेच धुलाई भत्त्याची रखडलेली २५०० रुपयांची रक्कमही चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर कासार यांनी केली. यावेळी या आंदोलनात चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष उज्ज्वला कर्‍हाड यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)