शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष पैसे घेऊन देतोय गुन्हेगारांना उमेदवारी दिली - भाजपा खासदाराचा आरोप

By admin | Updated: September 26, 2015 14:09 IST

बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पैसे घेऊन गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय गृह सचिव व भाजपा खासदार आर. के. सिंह यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २६ - बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पैसे घेऊन गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय गृह सचिव व भाजपा खासदार आर. के. सिंह यांनी केला. बिहार निवडणूकीला अवघे काही दिवसच उरलेले असतानाच सिंह यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ' पक्षातील प्रसिद्ध व काम करणा-या उमेदवारांना उमेदवारी नाकारण्यात येत आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्तेही खुश नसून त्यांच्यावरही परिणाम होत आहे. भाजपाने असे पैसे घेऊन उमेदवारी दिल्यास त्यांच्यात व लालूप्रसाद यादव यांच्यात फरक काय? असा सवालही त्यांनी विचारला आहे. 
बिहारमध्ये पुढील महिन्यापासून ( १२ ऑक्टोबर) पाच टप्प्यात विधानसभा निवडणूका पार पडणार असून तेथे भाजपा वि. महाआघाडी या दोन पक्षांमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळणार आहे. बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पक्षातील खासदारानेच घरचा आहेर दिल्याने चर्चा सुरू झाली आहे.