शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या विरोधात पाकिस्तान रचतोय मोठा कट! LoCवर पाठवले रणगाडे, सैनिक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 15:10 IST

काश्मीर मुद्द्यावरून सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषे(Line Of Control)जवळ जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी दिल्लीः काश्मीर मुद्द्यावरून सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषे(Line Of Control)जवळ जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्ताननं नियंत्रण रेषे(Line Of Control)जवळ रणगाडे पाठवले आहेत. तसेच आपल्या स्पेशल फोर्सच्या 100 कमांडोंनादेखील तैनात केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताविरोधात मोठी कारवाई करण्याच्या विचारात तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही आगळिकीला भारतीय लष्कर उत्तर देण्यास समर्थ असल्याचं लष्करानं सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं गुजरातल्या नियंत्रण रेषेजवळील स्वतःच्या भागात एसएसजी कमांडो तैनात केले होते. इक्बाल-बाजवा पोस्टवर पाक कमांडो ठेवले होते. कलम 370 जम्मू-काश्मीरमधून हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकत सुटला आहे. तसेच नियंत्रण रेषेवरही वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहेत.

भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई केली होती. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये घुसून कारवाई सुरू केली आहे. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला होता. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला होता.

  • पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पाकव्याप्त काश्मीरमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. PoKमधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत आहेत. तसेच 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीनं या क्षेत्राला अशांत ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय आहेत.

  • अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या बुधवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतावादी संघटनेचे सदस्य होते.  ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर नासिर चद्रू याचाही समावेश आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत