धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, तर माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा पद्मभूषणने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 18:53 IST2026-01-25T18:53:25+5:302026-01-25T18:53:59+5:30

केंद्र सरकारने पद्म पुरस्कार २०२६ ची अधिकृत घोषणा केली आहे. पाहा संपूर्ण यादी...

Padam Awards 2026: Actor Dharmendra posthumously awarded Padma Vibhushan, Bhagat Singh Koshyari honoured with Padma Bhushan | धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, तर माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा पद्मभूषणने सन्मान

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, तर माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा पद्मभूषणने सन्मान

Padam Awards 2026: केंद्र सरकारने पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा केली आहे. यंदा देशातील १३१ मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये ५ जणांना पद्मविभूषण, १३ जणांना पद्मभूषण, तर ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

यंदाच्या यादीत दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे. तर, झारखंड राज्यनिर्मितीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्यात आळा आहे. याशिवाय, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मान होणार आहे.

साल २०२६ साठी जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांनुसार... 

पद्मविभूषण : ५

पद्मभूषण : १३

पद्मश्री : ११३

पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी 

अनु. क्र.नावक्षेत्रराज्य
धर्मेंद्र (मरणोत्तर)कला
व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर)समाजकार्यकेरळ
के. टी. थॉमससमाजकार्यकेरळ
पी. नारायणनसाहित्य व शिक्षणकेरळ
एन. राजमकलाउत्तर प्रदेश

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी

अनु. क्र.नावक्षेत्रराज्य / देश
 अलका याज्ञिककलामहाराष्ट्र
 भगतसिंह कोश्यारीसार्वजनिक व्यवहारउत्तराखंड
 कल्लिपट्टी रामासामी पलानीस्वामीवैद्यकीय सेवातामिळनाडू
 ममूटीकलाकेरळ
डॉ. नोरी दत्तात्रेयुडूवैद्यकीय सेवासंयुक्त राज्य अमेरिका
 पियुष पांडेय (मरणोत्तर)कलामहाराष्ट्र
 एस. के. एम. माइलानंदनसमाजकार्यतामिळनाडू
 शतावधानी आर. गणेशकलाकर्नाटक
 शिबू सोरेन (मरणोत्तर)सार्वजनिक व्यवहारझारखंड
१० उदय कोटकव्यापार व उद्योगमहाराष्ट्र
११ व्ही. के. मल्होत्रा (मरणोपरांत)सार्वजनिक व्यवहारदिल्ली
१२ वेल्लापल्ली नटेशनसार्वजनिक व्यवहारकेरळ
१३ विजय अमृतराजक्रीडाअमेरिका

यंदाच्या यादीत विविध राज्यांतील मान्यवरांचा समावेश आहे.

केरळ : ८

तामिळनाडू : १३

पश्चिम बंगाल : ११

आसाम : ५

उत्तर प्रदेश : ११

महाराष्ट्र : १६

गणतंत्र दिनी होते पुरस्कारांची घोषणा

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. १९५४ साली सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते होते. हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय सेवा, समाजसेवा, विज्ञान व अभियांत्रिकी, लोकसेवा, नागरी सेवा, व्यापार व उद्योग अशा विविध क्षेत्रांतील असाधारण योगदानासाठी दिले जातात. जात, धर्म, लिंग किंवा व्यवसायभेद न करता सर्व नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र असतात. 

Web Title : धर्मेंद्र को मरणोपरांत पद्म विभूषण, भगत सिंह कोश्यारी पद्म भूषण से सम्मानित

Web Summary : सरकार ने पद्म पुरस्कार 2026 की घोषणा की। धर्मेंद्र को मरणोपरांत पद्म विभूषण, भगत सिंह कोश्यारी और शिबू सोरेन को पद्म भूषण से सम्मानित किया गया। कला, समाज सेवा और सार्वजनिक मामलों सहित विभिन्न क्षेत्रों में 131 व्यक्तियों को मान्यता दी गई।

Web Title : Dharmendra (Posthumous) Padma Vibhushan, Bhagat Singh Koshyari Padma Bhushan Honored

Web Summary : The government announced Padma Awards 2026. Dharmendra posthumously receives Padma Vibhushan. Bhagat Singh Koshyari and Shibu Soren also honored with Padma Bhushan. 131 individuals recognized across diverse fields including art, social work and public affairs.