चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 09:41 IST2025-05-16T09:32:59+5:302025-05-16T09:41:11+5:30
पी. चिदंबरम यांनी इंडिया आघाडी बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'इंडिया आघाडी कमकुवत झाली आहे. जर ही विरोधी आघाडी पूर्णपणे अबाधित राहिली तर मला खूप आनंद होईल',असं विधान चिदंबरम यांनी केले.

चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी मोदी सरकारच्या काही मुद्द्यांना पाठिंबा द्यायला सुरूवात केली आहे. आता त्यांच्यानंतर काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनीही भाजपाचे कौतुक करण्यास सुरूवात केली आहे.
एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी 'इंडिया आघाडी'बाबत विधान केले. ते म्हणाले, इंडिया आघाडीबाबत सलमान खुर्शीदच सांगू शकतात. कारण ते इंडिया आघाडीच्या वाटाघाटी करणाऱ्या टीमचा भाग होते. जर हे विरोधी युती पूर्णपणे अबाधित राहिली तर मला खूप आनंद होईल, असंही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
मोठ्या शक्तिविरोधात इंडिया आघाडी लढत आहे
चिदंबरम म्हणाले, इंडिया आघाडी अजूनही टिकवता येईल, अजूनही वेळ आहे. इंडीया आघाडी एका मोठ्या शक्तीविरुद्ध लढत आहे.
पी.चिदंबरम म्हणाले की, हे एकत्र ठेवता येईल. अजूनही वेळ आहे. माझ्या इतिहासाच्या अभ्यासात, कोणताही राजकीय पक्ष भाजपाइतका मजबूत संघटित झालेला नाही. प्रत्येक विभागात ते मजबूत आहे.
यापूर्वी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामवर आपले विधान केले होते. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'साठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते आणि केंद्र सरकारने उचललेले हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले होते.
भाजपवर हल्लाबोल
माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम म्हणाले की, विरोधकांना भाजपच्या "प्रबळ यंत्रणे"शी लढावे लागेल, जो फक्त एक राजकीय पक्ष नाही तर "यंत्रामागे एक यंत्रणा" आहे ज्यामध्ये भारतातील सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. चिदंबरम म्हणाले, 'माझ्या अनुभवानुसार आणि इतिहासाच्या अभ्यासानुसार, भाजपाइतका मजबूत संघटित कोणताही राजकीय पक्ष नाही. हा फक्त एक राजकीय पक्ष नाही तर तो एका यंत्रामागे दुसऱ्या यंत्रासारखा आहे आणि या दोन यंत्रांचं भारतातील सर्व यंत्रांवर नियंत्रण आहे. "निवडणूक आयोगापासून ते देशातील सर्वात लहान पोलिस स्टेशनपर्यंत, ते सर्वकाही नियंत्रित करू शकतात, असंही चिदंबरम म्हणाले.