शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

देशात सक्रिय रुग्ण १२ लाखांवर; २ लाख ६४ हजार नवे बाधित, ओमायक्राॅनग्रस्तांत ५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:20 AM

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे मागील २२० दिवसांतील सर्वाधिक आहे. 

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २ लाख ६४ हजार नवे रुग्ण आढळले. ही मागील २३९ दिवसांतील सर्वाधिक संख्या आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा ५७५३ वर पोहोचला आहे. गुरुवारपासून या विषाणूच्या बाधितांमध्ये ४.८३ टक्के वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १२ लाख ७२ हजार झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे मागील २२० दिवसांतील सर्वाधिक आहे. गेल्या चोवीस तासांत २ लाख ६४ हजार २०२ नवे रुग्ण आढळले व ३१५ जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४ लाख ८५ हजार ३५० झाली. कोरोनाबाधितांपैकी ३.४८ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९५.२० टक्के आहे. 

दिल्लीत मृतांपैकी ७५% लोकांनी घेतली नव्हती लस

दिल्लीमध्ये नुकत्याच आलेल्या लाटेत मरण पावलेल्यांपैकी ७५ टक्के जणांनी लस घेतली नव्हती अशी माहिती तेथील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. दिल्लीत गुरुवारी २८८६७ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. त्या शहरात ९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत कोरोनामुळे ९७ जण मरण पावले. 

मध्यप्रदेशातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद 

मध्य प्रदेश सरकारने ३१ जानेवारीपर्यंत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कृषिमंत्री कमल पटेल, जलसंसाधन मंत्री तुलसी सिलावट, वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत