शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलियम मंत्र्यांना भेटून बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 05:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बारसू रिफायनरी प्रकल्पाचा विरोध आता कोकणात पसरला असून, तो राज्यव्यापी होत असल्याचे बारसू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बारसू रिफायनरी प्रकल्पाचा विरोध आता कोकणात पसरला असून, तो राज्यव्यापी होत असल्याचे बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांना दिल्लीत भेटून सांगितले. या सर्व मुद्द्यांची आणि ग्रामस्थांच्या संघर्षाची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचे पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, वैभव कोळवणकर, नरेंद्र जोशी, कमलाकर गुरव, दीपक जोशी, शंकर जोशी, सत्यजित चव्हाण आणि नितीन जठार यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने हरदीपसिंह पुरी यांच्या संसदेतील कार्यालयात भेट घेतली.बारसू ते देवाचे गोठणेच्या सड्यावर असलेल्या दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचे महत्त्व, आंबोळगड-राजवाडी किनाऱ्याची जैवविविधता आणि सीआरझेड वर्गवारीबाबतची माहिती पेट्रोलियम मंत्र्यांना देण्यात आली. पंचक्रोशीतील ९५ टक्क्यांहून अधिक स्थानिक  ग्रामस्थ आणि कोकणवासी बारसू पंचक्रोशीत हा प्रकल्प होऊ देणार नाहीत, असे संघटनेने स्पष्ट केले. 

 पुरी यांना भेटण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत तसेच ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली.

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प