शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

कुंभमेळ्यासाठी हवेत 'संस्कारी' पोलीस; शाकाहारी, निर्व्यसनी कर्मचाऱ्यांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 1:10 PM

15 जानेवारीपासून सुरू होणार कुंभमेळा

अलाहाबाद: तरुण, तडफदार, निर्व्यसनी, मृदूभाषी, शाकाहारी व्यक्ती हवी. ही काही एखाद्या लग्नासाठी दिलेली जाहिरात नाही. तर कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या पोलिसांमध्ये हे गुण असायला हवेत. कारण उत्तर प्रदेश सरकारला कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी संस्कारी पोलीस हवे आहेत. 15 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. याच्या सुरक्षेची जबाबदारी 'संस्कारी' पोलिसांवर सोपवली जाणार आहे. अलाहाबादमधील कुंभमेळ्यात 'चारित्र्यवान' पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केलं जाणार आहे. यासाठी अलाहाबादबाहेरील पोलिसांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी 10 हजार पोलीस तैनात असणार आहेत. याची सुरुवात ऑक्टोबरपासून होईल. पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवानदेखील कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी हजर राहतील. कुंभमेळाव्याच्या सुरक्षेसाठी तरुण पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येणार आहे. वयाची पस्तिशी उलटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे बंदोबस्ताची जबाबदारी दिली जाणार नाही. कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी डीआयजी के. पी. सिंह यांनी बरेली, बदायू, शाहजहापूर आणि पिलीभीतमधील पोलीस प्रमुखांशी संपर्क साधला आहे. सिंह यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचं चारित्र्य प्रमाणपत्र मागितलं आहे. कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी शाकाहारी, निर्व्यसनी आणि मृदूभाषी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. जवळपासच्या पोलीस ठाण्यांकडून कर्मचाऱ्यांचं चारित्र्य प्रमाणपत्र आल्यावरच त्यांना कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश