अरे बापरे! नदीत सापडला तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब, बॉम्ब स्क्वॉडही मागे हटलं, आता लष्कराला करणार पाचारण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:12 IST2026-03-20T14:12:32+5:302026-03-20T14:12:58+5:30

Bomb Found In River News: झारखंडमधील जमशेदपूर जिल्ह्यातील बहरागोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वर्णरेखा नदीमध्ये तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Oh my god! A bomb weighing 226 kg was found in the river, the bomb squad also retreated, now the army will be called in. | अरे बापरे! नदीत सापडला तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब, बॉम्ब स्क्वॉडही मागे हटलं, आता लष्कराला करणार पाचारण   

अरे बापरे! नदीत सापडला तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब, बॉम्ब स्क्वॉडही मागे हटलं, आता लष्कराला करणार पाचारण   

झारखंडमधील जमशेदपूर जिल्ह्यातील बहरागोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वर्णरेखा नदीमध्ये तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातील नदीत सापलेली ही लोखंडी वस्तू काहीतरी सामान्य वस्तू असावी असे मानले जात होते. मात्र तपासामध्ये हा लोखंडाचा साधा तुकडा नाही तर बॉम्ब असल्याचे तपासणीनंतर समोर आल्यानंतर साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. रांचीमधून येथे दाखल झालेल्या बॉम्ब स्क्वॉडने प्राथमिक तपासानंतर हा ५०० पौंड म्हणजेच सुमारे २२६ किलो वजनाचा शक्तिशाली बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता या बॉम्बच्या हाताळणीबाबत अधिक खबरदारी घेतली जात आहे.

बॉम्ब स्क्वॉडचे प्रभारी नंदकिशोर सिंह यांनी सांगितले की, हे कुठले सामान्य स्फोटक नाही तर खूप मोठा आणि धोकादायक बॉम्ब असल्याचे दिसत आहे. या बॉम्बला निष्क्रिय करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान आणि बॉम्ब निष्क्रिय करण्याचं कौशल्य आवश्यक आहे. हे कौशल्या सर्वसाधारणपणे भारतील लष्कराजवळ उपलब्ध असतं. अशा परिस्थितीत आता बॉम्ब सुरक्षितपणे निष्क्रिय करण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. तसेच हा बॉम्ब ज्या ठिकाणी सापडला ते ठिकाण त्वरित सील करण्यात आलं आहे. तसेच संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने आजूबाजूच्या ग्रामस्थांना या परिसरात न येण्याची आणि संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याटी सूचना दिली आहे.

दरम्यान, बहरागोडा येथील अधिकारी राजाराम मुंडा यांनी सांगितले की, बॉम्ब स्क्वॉडने घटनास्थळाचं निरीक्षण केलं आहे. तसेच पुढील कारवाईसाठी उच्चाधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जात आहे, असेही त्यांनी सांगितले.  

Web Title : नदी में मिला विशाल बम, सेना को निष्क्रिय करने के लिए बुलाया गया

Web Summary : झारखंड की स्वर्णरेखा नदी में 226 किलो का बम मिलने से दहशत फैल गई। बम निरोधक दस्ते ने इसे खतरनाक माना, सुरक्षित हटाने के लिए सेना की मदद मांगी। इलाके को सील कर दिया गया है, निवासियों को दूर रहने की चेतावनी दी गई है।

Web Title : Massive Bomb Found in River, Army Called for Disposal

Web Summary : A 226 kg bomb was discovered in Jharkhand's Swarnarekha River, creating panic. Bomb disposal squads deemed it too dangerous, requiring army assistance for safe removal. The area is sealed off, and residents are warned to stay away.