आता राफेल भारतातच बनणार...! राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:59 IST2026-02-19T20:57:24+5:302026-02-19T20:59:08+5:30
महत्वाचे म्हणजे, राफेलप्रमाणेच सहकार्याचे हे मॉडेल पाणबुड्यांसह इतर मोठ्या संरक्षण क्षेत्रांतही लागू होऊ शकते, असे संकेतही मॅक्रॉन यांनी दिले. एरोस्पेस क्षेत्रासंदर्भातही त्यांनी भाष्यक केले.

आता राफेल भारतातच बनणार...! राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
Rafale Jets Make in India: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी भारतासोबतच्या संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घेषणा केली आहे. आता राफेल लढाऊ विमाने 'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतातच तयार केली जातील. दोन्ही देश राफेल जेट कार्यक्रम पुढे नेण्यास उत्सुक आहेत. भारतात होणारे हे संयुक्त उत्पादन भविष्यातील ऑर्डरचा मुख्य आधार ठरेल. भारत-फ्रान्स 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' ही केवळ संरक्षण संबंधांपुरती मर्यादित नाही, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. 'इंडिया AI समिट' दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
११४ विमानांच्या नव्या ऑर्डरमध्ये 'मेक इन इंडिया' केंद्रस्थानी -
मॅक्रॉन म्हणाले, भारताने अलीकडेच राफेल विमानांच्या नवीन बॅचसाठी ऑर्डर देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी, भारताने ११४ नवीन राफेल विमानांचा एक नवीन बॅच ऑर्डर करण्याची आणि त्यांचे एकत्रित उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली. या नवीन ऑर्डरमध्ये 'मेक इन इंडिया' केंद्र स्थानी असेल." तसेच, हे पाऊल विद्यमान सहकार्य अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने एक नवीन टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांमनी व्यक्त केला.
इतर संरक्षण क्षेत्रांतही सहकार्य वाढणार -
महत्वाचे म्हणजे, राफेलप्रमाणेच सहकार्याचे हे मॉडेल पाणबुड्यांसह इतर मोठ्या संरक्षण क्षेत्रांतही लागू होऊ शकते, असे संकेतही मॅक्रॉन यांनी दिले. एरोस्पेस क्षेत्रासंदर्भातही त्यांनी भाष्यक केले. फ्रान्स भारतात जास्तीत जास्त स्थानिक सामग्री (Local Content) आणि महत्त्वाच्या उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. जास्तीत जास्त भारतीय घटक आणि उपकरणांची निर्मिती भारतातच व्हावी, यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता," असेही मॅक्रॉन यांनी म्हटेल आहे.