शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जूनमध्ये?

By admin | Updated: March 18, 2016 02:08 IST

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कधी होतेय याची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची उत्कंठा येत्या जूनमध्ये बहुधा संपुष्टात येईल. पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, केरळ, तामिळनाडू

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कधी होतेय याची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची उत्कंठा येत्या जूनमध्ये बहुधा संपुष्टात येईल. पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, केरळ, तामिळनाडू आणि आसाम राज्याच्या विधानसभांची निवडणूक चार एप्रिल ते १६ मे या दरम्यान होऊन १९ मे रोजी मतमोजणी होईल. २१ मेपर्यंत आचारसंहिता लागू असल्यामुळे वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना सरकार केवळ जूनमध्येच काढू शकेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.अर्थमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात वेतन आयोगाशी संबंधित निर्णय जाहीर करून सरकार आपली प्रतिमा कलंकित करू इच्छित नाही. त्याच वेळी निवडणुकीच्या कालावधीत विरोधकांना सरकारवर हल्ला करण्यासाठी आयते निमित्तही पुरवू इच्छित नाही. म्हणून सरकार सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना २१ मेनंतर जारी करण्याची जास्त शक्यता आहे.सूत्रांनी असेही सांगितले की, सचिवांच्या या विशेषाधिकार समितीची अंमलबजावणी शाखा सर्व संबंधितांनी ज्या तक्रारी केल्या आहेत त्या दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहे. आपल्या अहवालावर शेवटचा हात फिरवल्यानंतर ही समिती आपल्या शिफारशी पंतप्रधान कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठवून देईल. पंतप्रधान कार्यालयाने या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल मंत्रिमंडळासमोर अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाईल. ही सगळी प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल. आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची ही शेवटची मुदत सरकारने विचारात घेतली आहे.काही शिफारसींचा समितीतर्फे अभ्याससातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एप्रिलमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता; परंतु मंत्रिमंडळ सचिवांच्या नेतृत्वाखालील सचिवांची विशेषाधिकार समिती सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींतील काही त्रुटी पाच राज्यांतील निवडणुकांच्या आधी दूर करू शकणार नाही. आयोगाने अ‍ॅडव्हान्सेस (आगाऊ उचल), भत्ते आणि किमान वेतन रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. याचाही समिती अभ्यास करीत आहे.