शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

तुम्ही 'त्यांचे' वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं आडनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 4:12 PM

राहुल गांधींविरोधात भाजपाची आक्रमक भूमिका 

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत भारत बचाओ रॅली काढली. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीभाजपावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी रेप इन इंडिया विधानाबद्दल माफी मागण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपा नेत्यांनी राहुल यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी राहुल यांना नवं आडनाव सुचवलं आहे. राहुल यांनी जिन्ना आडनाव लावावं, असा सल्ला त्यांनी दिला. 'तुम्हाला गांधी नव्हे, जिन्ना आडनाव जास्त शोभून दिसेल. मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या राजकारणामुळे आणि मानसिकतेमुळे तुम्ही सावरकरांचे नाहीत, तर मोहम्मद अली जिन्नांचे योग्य वारसदार शोभता,' अशा शब्दांमध्ये राव यांनी राहुल यांच्यावर पलटवार केला. राव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसलादेखील टॅग केलं आहे.  तत्पूर्वी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील राहुल गांधींवर शरसंधान साधलं. 'वीर सावरकर खरेखुरे देशभक्त होते. आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होत नाही, कोणी देशभक्त होऊ शकत नाही. देशभक्त होण्यासाठी धमन्यांमध्ये शुद्ध हिंदुस्तानी रक्त असायला हवं. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटलं आहे. मात्र आता तसं होणार नाही. हे तीनजण कोण आहेत? हे तिघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का?,' असे प्रश्न उपस्थित करताना गिरीराज यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो ट्विट केला आहे.  राहुल गांधींनी देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरुन झारखंडमधील सभेतून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यावरुन काल संसदेत गदारोळ झाला. राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला. गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारत धगधगतो आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हणत राहुल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस