शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याइतका मुर्ख नाही, पण मोदींच्या मौनामुळे दु:ख - प्रकाश राज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 09:49 IST

प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण देत आपण गौरी लंकेश हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन बाळगल्याने दुखी आहोत, मात्र आपण पुरस्कार परत करणार असल्याचं बोललो नव्हतो असं सांगितलं आहे. 

बंगळुरु - अभिनेता प्रकाश राज यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ आपले राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आपले पुरस्कार परत करण्याइतका मी मुर्ख नाही असं प्रकाश राज बोलले आहेत. सोमवारी प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे असं वृत्त आलं होतं. प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण देत आपण गौरी लंकेश हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन बाळगल्याने दुखी आहोत, मात्र आपण पुरस्कार परत करणार असल्याचं बोललो नव्हतो असं सांगितलं आहे. 

प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, 'प्रकाश राज यांनी आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे अशा बातम्या पाहून मी फक्त हसू शकतो. आपले राष्ट्रीय पुरस्कार परत करेन इतका मी मुर्ख नाही. हे पुरस्कार मला माझ्या कामासाठी देण्यात आले आहेत, ज्याचा मला गर्व आहे'.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगल्याने आपण दुखी: आहोत हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. प्रकाश राज बोलले आहेत की, 'गौरी लंकेश यांची हत्या साजरा करणा-यांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात हे फार दु:खद आहे'.


'गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या कोणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यांची हत्या कोणी केली याचा तपास करण्यासाठी पोलीस, एसआयटी आहे. हत्येचा आनंद कोण साजरा करत आहे हे फक्त आपण पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर आनंद साजरा होत आहे हे पाहून माझ्यासारख्या व्यक्तीला दुख: होतं. माझा प्रश्न आहे की अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात आणि यावर कोणतीच भूमिका घेत नाहीत. साधं या घटनेवर ते भाष्यही करत नाहीत. अशा परिस्थितीत या देशाचा एक नागरिक म्हणून मला खूप दु:ख होतं', असं प्रकाश राज बोलले आहेत. 

'आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, या देशाचा एक नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकतो', असं प्रकाश राज यांनी स्पष्ट केलं.  
 

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणNarendra Modiनरेंद्र मोदी