शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अशासकीय सल्लागारांना व महामंडळ अध्यक्षांना हटविले

By admin | Updated: March 22, 2017 00:42 IST

उत्तर प्रदेशातील अशासकीय सल्लागार, विविध महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना पदमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशातील अशासकीय सल्लागार, विविध महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना पदमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्यानुसार, मुख्य सचिव राहुल भटनागर यांनी या पदाधिकाऱ्यांना तत्काळ पदमुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना, या नेमणुका करण्यात आल्या होत्या आणि नवे सरकार आल्यावर त्यांना जावे लागेल, हे अपेक्षितच होते. सर्व प्रमुख सचिव, सचिव व अन्य अधिकारी यांनी या आदेशांचे पालन करावे, अशा सूचना मुख्य सचिव राहुल भटनागर यांनी दिल्या आहेत. पूर्वीच्या सपा सरकारने विविध महामंडळ, समित्या आणि विभागातील ८० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यात पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे व्यक्ती आहेत. काही पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर ज्या व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत, त्यात मुख्यमंत्र्यांचे सल्लागार माजी मुख्य सचिव अलोक रंजन, उर्दू अकादमीचे अध्यक्ष नवाज देवबंदी, हिंदी संस्थानचे अध्यक्ष उदय प्रताप यादव यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे. सरकारने राज्य अल्पसंख्यांक आयोग, मागास वर्ग आयोग आणि राज्य महिला आयोगासह अनेक विभागांच्या अध्यक्षांबाबत निर्णय घेतलेला नाही. (वृत्तसंस्था)