शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बिहार मंत्रिमंडळ: स्वातंत्र्यानंतर 'हे' असं पहिल्यांदाच घडलं

By मोरेश्वर येरम | Updated: November 18, 2020 15:54 IST

सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे. 

ठळक मुद्देनितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाहीस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिहारच्या मंत्रिमंडळात मुस्लिम चेहरा नाहीएनडीएकडून यावेळी एकही मुस्लिम आमदार निवडून आला नाही

पाटणानितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. पण मंत्रिमंडळात एकही मुस्लिम आमदाराला स्थान मिळालेले नाही. इतकंच नव्हे तर बिहारमध्ये सत्ता स्थापन केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) एकही मुस्लिम आमदार नाही.  बिहारमध्ये भाजप, जदयू, हिंदूस्तान आवाम मोर्चा (सेक्यूलर) आणि विकासशील इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएने बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. पण या सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या 'जदयू'कडून यावेळीच्या निवडणुकीत एकूण ११ मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण ते सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीवेळी नितीश कुमार यांना एका मुस्लिम उमेदवाराला मंत्रिमंडळात स्थान देण्याची संधी होती. त्यानंतर विधान परिषदेवर त्या उमेदवाराला निवडून आणता आलं असतं. पण तशीही भूमिका नितीश कुमार यांनी घेतली नाही. 

राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांच्यासह एकूण १५ मंत्र्यांना पद आणि गोपनियतीची शपथ दिली. यातील चार मंत्री हे उच्चवर्णीय, चार मागास जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. तर तीन अत्यंत मागासवर्गीय आणि तीन अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. 

घटनात्मक तरतुदीनुसार बिहार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३६ सदस्यांची मंत्रीपदी नियुक्ती करता येऊ शकते. नितीश यांच्या मंत्रिमंडळात अजूनही २१ जणांची जागा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला स्थान दिलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बिहारच्या निवडणूक निकालात सत्ताधारी एनडीएने १२५ जागांवर यश मिळवत सत्तास्थापनेचा दावा केला. तर महागठबंधनला ११० जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महागठबंधनमध्ये 'राजद'ला सर्वाधिक ७५ जागांवर यश मिळालं आहे. तर भाजप ७४ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जदयूला ४३ जागा मिळाल्या, तर काँग्रेसच्या पदरात १९ जागांवर यश मिळालं आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण