शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत चीनकडून घुसखोरी नाही, गृहराज्यमंत्र्यांचे राज्यसभेत लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:21 IST

लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य लडाख सीमेवर नेमके काय सुरू आहे, याची संदिग्धता केंद्र सरकारनेच वाढवली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारत- चीन सीमेवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झालाच नसल्याचे केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे.लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत. राज्यसभेत भाजप खासदारानेच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे उत्तर दिल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कर, परराष्ट्र मंत्रालयानेदेखील चीनकडून यथास्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे व भारताने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे वारंवार म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील भारतीय हद्दीत चीन घुसखोरीचा प्रयत्न करीत असल्याचे लोकसभेत स्पष्ट केले होते. आता मात्र लेखी उत्तरामुळे परस्परविरोधी भूमिका समोर आली आहे.गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या उत्तरात पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने घुसखोरीचा एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रयत्न केला. जवानांनी तो हाणून पाडला. चीनकडून मात्र घुसखोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. चीनसमवेत भारताचे संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर सशस्त्र जवान चीनला धडा शिकवण्यासाठी तयार आहेत. राजनैतिक, राजकीय, चर्चा निष्फळ होताना दिसत असल्याने सीमा भागात युद्धस्थिती असल्याचे सरकारकडूनही संकेत मिळत आहेत. मंगळवारी लोकसभेत राजनाथ सिंह म्हणाले होते की, चीनने अनेकदा घुसखोरीची प्रयत्न केला. सीमेवर अनेकदा तणाव निर्माण होतो; पण संवादाने, चर्चेने त्यावर मात करता येत. आता चीनने या भागात कुमक वाढवली आहे. १९५० पासून सीमा प्रश्न सोडविण्यासाठी भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली.

टॅग्स :chinaचीनParliamentसंसद