विरोधकांना झटका; ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:50 IST2026-03-11T18:47:46+5:302026-03-11T18:50:39+5:30
ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

विरोधकांना झटका; ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला
नवी दिल्ली: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असून, आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
दोन दिवस चालली चर्चा
विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर लोकसभेत सलग दोन दिवस चर्चा झाली. चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.
#WATCH | Lok Sabha rejects opposition's No Confidence Motion against Speaker Om Birla by voice vote amid sloganeering.
— ANI (@ANI) March 11, 2026
House adjourned for the day pic.twitter.com/Cs2I7C8rls
अमित शाह यांचे अध्यक्षांच्या बाजूने समर्थन
चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्षांचे जोरदार समर्थन केले. त्यांनी सांगितले की, अध्यक्षांचे पद पक्षीय राजकारणापेक्षा वरचे आहे आणि त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत संसदीय नियम आणि परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले.
बोलण्याची वेळ येते, तेव्हा राहुल गांधी परदेश दौर्यावर जातात; शाहांच्या टीकेवर लोकसभेत गोंधळ
आवाजी मतदानाने प्रस्ताव फेटाळला
चर्चा संपल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. आवाजी मतदानाच्या आधारे लोकसभेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार असून विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. दरम्यान, अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदानानंतर, पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी उद्या (१२ मार्च) सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.