शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विमानांची भरारी आजपासून पूर्ण क्षमतेने; आसन मर्यादेची अट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 09:21 IST

तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना काहीसा दिलासा

मुंबई : आजपासून देशांतर्गत विमाने पूर्ण क्षमतेसह उड्डाण करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासासाठी लागू केलेली आसन मर्यादा हटविण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला असून, १८ ऑक्टोबरपासून देशभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.हवाई मार्गाने कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होत असल्याची चर्चा पहिल्या लाटेच्या काळात होती.  त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि अंतर नियम पालनासाठी विमानातील प्रवासी क्षमतेवर मर्यादा आणण्यात आल्या. लॉकडाऊनच्या दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर, २५ मे, २०२० रोजी ३३ टक्के आसन क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली. डिसेंबर, २०२० पर्यंत हळूहळू ही मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे १ जून, २०२१ रोजी पुन्हा एकदा वाहन क्षमता ५० टक्क्यांवर आणण्यात आली. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला. जूनपासून दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने प्रवासी क्षमता पूर्ववत करण्याची मागणी विमान कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत होती.कोरोना पूर्वकाळाच्या दिशेने गेल्या काही दिवसांपासून हवाई प्रवाशांची संख्या कोरोना पूर्वकाळाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.शिवाय सणासुदीला विमान प्रवासाची मागणी वाढल्यामुळे आसन क्षमतेची अट अडथळा ठरू लागली आहे. मुंबई, दिल्लीसारख्या महत्त्वाच्या विमानतळांवर गर्दी वाढू लागल्यामुळे, तिच्या व्यवस्थापनासाठी ही अट काढून टाकण्यात आली आहे.