शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी; नितीन गडकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 1:07 PM

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांची ट्विटरवरून मोठी घोषणामहाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूरनवीन रस्ते, पूल, विस्तारीकरणाची मोठी योजना

नवी दिल्ली : देशाच्या विकासासाठी पायाभूत आणि रस्ते विकास महत्त्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी तब्बल २,७८० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. (nitin gadkari on road works in maharashtra)

नितीन गडकरी यांनी एकामागून एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. हे ट्विट करताना नितीन गडकरी यांनी 'प्रगती का हायवे' असा हॅशटॅग वापरला आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. 

केंद्राची नवी योजना! ४ कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लावणार; प्रस्ताव राज्यांना पाठवला

कोकणवासीयांसाठी खास भेट

महाराष्ट्रातील रस्ते कामांपैकी कोकणवासियांसाठी गडकरींनी खास भेट दिली आहे. चिपळूणच नाही तर जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५३ जेच्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे नितीन गडकरींनी ट्विटरवरून सांगितले. सदर रस्ता दोन किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. गडचिरोली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ३५३ सीवरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील; नितीन गडकरींनी दिले वचन

तारीरी- गगनबावडा-कोल्हापूर

राष्ट्रीय महामार्ग ७५२ आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी २२८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच तिरोरा ते गोंदियादरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दोन पदरी रस्ते बांधकामासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारीरी- गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग १६६ जीवरील रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपये, तिरोरा गोंदिया राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राष्ट्रीय महामार्ग ७५३ अंतर्गत २८.२ किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.

रेल्वे व बँकांनंतर आता महामार्गांचे खासगीकरण; एक लाख कोटी उभारणार: नितीन गडकरी

नागपूर, नांदेडमध्ये पूल बांधणी

नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग ६३ चा भाग असेल. नागपूरमध्ये आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकूण ४७८ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमगाव-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग ५४३ साठी २३९ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी २२२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणnagpurनागपूरChiplunचिपळुणkolhapurकोल्हापूरGadchiroliगडचिरोली