फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील; नितीन गडकरींनी दिले वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 02:41 PM2021-03-26T14:41:24+5:302021-03-26T14:45:20+5:30

nitin gadkari: आगामी काही दिवसांत पायाभूत सुविधा पूर्णपणे बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

nitin gadkari assured that india infrastructure to be no less than us europe in next 5 years | फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील; नितीन गडकरींनी दिले वचन

फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील; नितीन गडकरींनी दिले वचन

Next
ठळक मुद्देहजारो कोटींचे प्रकल्प देशभरात सुरू - नितीन गडकरीप्रकल्प प्रत्यक्षात आल्यावर दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल - नितीन गडकरीअभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना देशाला पाहता येईल - नितीन गडकरी

नवी दिल्ली : आताच्या घडीला देशात रस्ते आणि पायाभूत सुविधांचे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. या माध्यमातून प्रवास सुविधाजनक आणि गतिमान करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशवासीयांना आश्वस्त केले असून, आगामी काही दिवसांत पायाभूत सुविधा पूर्णपणे बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (nitin gadkari assured that india infrastructure to be no less than us europe in next 5 years) 

दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत आश्वस्त केले. आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला असून, यामध्ये गेल्या ५ वर्षात १७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

फडणवीसजी, लूज बॉलवरच मोठी विकेट जाते, हे लक्षात ठेवावे; संजय राऊतांची गुगली

सीमाभागांचा विकास हे सरकारचे लक्ष्य 

देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वांत मोठे लक्ष्य आहे. ग्रीन एक्सप्रेसवे कॉरीडोरचं नेकवर्क पूर्णपणे सज्ज आहे. ज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि ३० किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना

देशातील सर्व प्रकल्पांवर १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना असेल. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल. सीमेवरील रस्ते बांधण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केले जात आहे, असेही गडकरी म्हणाले. 

रेल्वे व बँकांनंतर आता महामार्गांचे खासगीकरण; एक लाख कोटी उभारणार: नितीन गडकरी

एक लाख कोटी रुपये उभारण्याची योजना

राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे. यातून मिळालेला निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. NHAI आगामी पाच वर्षांत टोल वसुली आणि राष्ट्रीय महामार्गांच्या हस्तांतरणाद्वारे बाजारपेठेतून एक लाख कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.  

नितीन गडकरींचा मेगा प्लान; Green Highways वर ७ लाख कोटी खर्च करणार

दिल्ली-मुंबई प्रवास कारने केवळ १२ तासांत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन अंतर्गत १११ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले असून, हरित दृष्टीकोन स्वीकारत पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. २२ ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान वाहनाने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास १२ तासांत होऊ शकेल. आताच्या घडीला या प्रवासाला ४० तास लागतात, असेही गडकरी म्हणाले. 

Web Title: nitin gadkari assured that india infrastructure to be no less than us europe in next 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.