फडणवीसजी, लूज बॉलवरच मोठी विकेट जाते, हे लक्षात ठेवावे; संजय राऊतांची गुगली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:54 PM2021-03-26T12:54:52+5:302021-03-26T12:58:11+5:30

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यावर पलटवार केला.

shiv sena leader sanjay raut replied on devendra fadnavis statement | फडणवीसजी, लूज बॉलवरच मोठी विकेट जाते, हे लक्षात ठेवावे; संजय राऊतांची गुगली

फडणवीसजी, लूज बॉलवरच मोठी विकेट जाते, हे लक्षात ठेवावे; संजय राऊतांची गुगली

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तरUPA दिल्लीतील विषय, स्थानिकांनी बोलू नये; नाना पटोलेंवर पलटवारराजकारणात कुणावर इतका विश्वास ठेवायचा नसतो - संजय राऊत

नवी दिल्ली : परमबीर सिंग पत्र प्रकरण (Param Bir Singh letter), रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरण, सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze) यामुळे राज्यातील राजकीय वातावरण शिगेला पोहोचले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजपसह अन्य पक्षांकडूनही होताना दिसत आहे. या सर्व प्रकरणी राजकारण तापले असताना शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी शुक्रवारी दिल्लीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यावर पलटवार केला. राजकारणात कुणावरही इतका विश्वास टाकायचा नसतो, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला. (shiv sena leader sanjay raut replied on devendra fadnavis statement)

संजय राऊत दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. एकदा हात पोळूनही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचे आश्चर्य वाटते. राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या सगळ्या अनुभवानंतर तरी शहाणपण शिकावे, असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला.

“इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे?”

लूज बॉलवरच मोठी विकेट जाते

देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर संजय राऊत यांनी टोला लगावला. महाराष्ट्रात फक्त चंद्रशेखर भागवत हे एकटेच गुगली टाकायचे. बाकी गुगली गोलंदाज हे डुप्लिकेट आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

UPA दिल्लीतील विषय, स्थानिकांनी बोलू नये

राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे आहे. हे ज्या स्थानिक नेत्यांना कळत नाही त्यांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक, तेदेखील यावर चिंतन करत आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी नाना पटोले आणि काँग्रेस नेत्यांना सुनावले. 

“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

दरम्यान, शरद पवार पश्चिम बंगालला जाणार आहेत. माझा विचार आहे जाण्याचा. काँग्रेसने आक्षेप घेतलेला, परंतू पवार हे देशाच्या फायद्याचा त्यांच्या विवेकबुद्धीला पटणारा निर्णय घेतात. यामुळे भाजपाची प्रचार करण्याची पद्धत पाहता ममतांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.  

Web Title: shiv sena leader sanjay raut replied on devendra fadnavis statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.