“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:59 PM2021-03-25T14:59:43+5:302021-03-25T15:02:55+5:30

zp election - भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शिवसेनेच्या (Shiv Sena) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

shiv sena leader vaibhav naik criticised nitesh rane on zp election | “नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

Next
ठळक मुद्देनितेश राणे यांच्यावर शिवसेनेचे टीकास्त्रनितेश राणेंचा पराभव करून शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊनारायण राणेंचे आव्हान आम्ही कधीच संपवले - शिवसेना

सिंधुदुर्ग : अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारली. भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शिवसेनेच्या (Shiv Sena) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावर आता शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत नितेश  (Nitesh Rane) राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितेश राणे यांचा पराभव करत शिवसेना काय आहे, ते दाखवून देऊ, असा आक्रमक पवित्रा वैभव नाईक यांनी घेतला आहे. (shiv sena leader vaibhav naik criticised nitesh rane on zp election)

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती. वैभव नाईक हे आमच्याशी आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणाऱ्याला दहा जन्म घ्यावे लागतील, असे नितेश राणे म्हणाले होते. यावर वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

“आपला संबंध नाही, त्या विषयावर...”; नाना पटोलेंचा संजय राऊत यांना टोला

नारायण राणेंचे आव्हान आम्ही कधीच संपवले

नितेश राणे यांचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे, हे दाखवून देऊ. नारायण राणे यांचे आव्हान आम्ही कधीच संपवले. २०१४ च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला, तर गेल्या निवडणुकीत माझ्यामुळेच नारायण राणे यांनी पळ काढला, अशी बोचरी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. 

 ठरलं! शरद पवार घेणार ममता दीदींची भेट; काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारली. भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. संजना सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा ३० विरुद्ध १९ अशा फरकाने पराभव केला. भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. 

Web Title: shiv sena leader vaibhav naik criticised nitesh rane on zp election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.