“आपला संबंध नाही, त्या विषयावर...”; नाना पटोलेंचा संजय राऊत यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:18 PM2021-03-25T14:18:19+5:302021-03-25T14:21:00+5:30

नाना पटोले यांनी संजय राऊत यांना टोला लगावत प्रतिक्रिया दिली आहे.

congress leader nana patole react over sanjay raut statement on sharad pawar | “आपला संबंध नाही, त्या विषयावर...”; नाना पटोलेंचा संजय राऊत यांना टोला

“आपला संबंध नाही, त्या विषयावर...”; नाना पटोलेंचा संजय राऊत यांना टोला

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांचा संजय राऊत यांना टोलाशरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का - नाना पटोलेनाना पटोले यांनी संजय राऊतांना दिला मोलाचा सल्ला

मुंबई : सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case), परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'यूपीए'चे नेतृत्व करावे, असे मत मांडले होते. मात्र, आता नाना पटोले यांनी संजय राऊत यांना टोला लगावत प्रतिक्रिया दिली आहे. (congress leader nana patole react over sanjay raut statement on sharad pawar)

नाना पटोले यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत बोलताना संजय राऊत यांनी युपीए विकलांग झाली असून, त्याचे नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे, असे म्हटले होते. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटल्याचे सांगितले जात आहेत.

शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का

युपीएचे नेतृत्व कोणी करावे हे युपीएच्या सदस्यांनी ठरवले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का, असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये. इतकाच आमचा सल्ला आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

ठरलं! शरद पवार घेणार ममता दीदींची भेट; काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला

काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे नाही

काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचे नेतृत्व खंबीरपणे केले आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अशावेळी युपीएचे नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे, असेही राऊत म्हणाले होते. 

दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लस द्या; शिवसेनेची लोकसभेत मागणी

दरम्यान, भाजपने सुरू केलेला आरोपांचा सपाटा हा राज्य सरकारची नव्हे, तर महाराष्ट्राची बदनामी करणारा आहे. त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. भाजपने आजवर केलेल्या आरोपांचे काय झाले, याचा इतिहास पाहिला तर खोटे आरोप करण्याची प्रथा त्यांनी सुरू केलीय, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.

Web Title: congress leader nana patole react over sanjay raut statement on sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.