Nipah Virus : धोक्याची घंटा! देशात निपाह व्हायरसची एन्ट्री, सापडले २ रुग्ण; 'ही' आहेत लक्षणं, 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 19:51 IST2026-01-26T19:51:36+5:302026-01-26T19:51:53+5:30

Nipah Virus : निपाह व्हायरसची दोन प्रकरणं समोर आली असून दोन्ही रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

Nipah Virus cases increasing in india know causes symptoms and treatment | Nipah Virus : धोक्याची घंटा! देशात निपाह व्हायरसची एन्ट्री, सापडले २ रुग्ण; 'ही' आहेत लक्षणं, 'अशी' घ्या काळजी

Nipah Virus : धोक्याची घंटा! देशात निपाह व्हायरसची एन्ट्री, सापडले २ रुग्ण; 'ही' आहेत लक्षणं, 'अशी' घ्या काळजी

पश्चिम बंगालमध्ये निपाह व्हायरसची दोन प्रकरणं समोर आली असून दोन्ही रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. केंद्र सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी 'नॅशनल जॉइंट आउटब्रेक रिस्पॉन्स टीम' बंगालमध्ये पाठवली आहे. बंगालमध्ये रुग्ण आढळल्याने इतर राज्यांमध्येही या व्हायरसचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, निपाह व्हायरस म्हणजे काय, तो कसा पसरतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत, हे जाणून घेणं आवश्यक आहे. 

लेडी हार्डिंग हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाच्या तज्ज्ञांच्या मते, निपाह व्हायरस प्रामुख्याने फळं खाणाऱ्या वटवाघुळांमध्ये आढळतो आणि तिथूनच तो मानवांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये पसरतो. जेव्हा एखादं संक्रमित वटवाघूळ एखादं फळ किंवा इतर पदार्थ खातं आणि तेच उष्ट चुकून मानवाकडून खाल्लं जातं, तेव्हा हे संक्रमण पसरतं. एखादी व्यक्ती संक्रमित झाली की, हा व्हायरस दुसऱ्या मानवामध्ये देखील पसरू शकतो. जरी याचे मानवी संक्रमण फार वेगाने होत नसले, तरी धोका मात्र कायम असतो.

निपाह व्हायरस किती धोकादायक?

डॉ. घोटेकर यांच्या मते निपाह व्हायरस इतर व्हायरसच्या तुलनेत खूपच भयानक आहे. यामध्ये मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असू शकतो. हा व्हायरस अधिक घातक ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे तो थेट मेंदूवर हल्ला करतो, ज्यामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. एकदा रुग्ण कोमात गेला की त्याचा जीव वाचवणं कठीण होतं. विशेष म्हणजे या व्हायरसवर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नसल्यामुळे काळजी घेणं हाच एकमेव उपाय आहे.

निपाह व्हायरसची लक्षणं

डोकेदुखी

ताप

उलट्या आणि चक्कर येणं

घसा दुखणं

शुद्ध हरपणं

अशी घ्या काळजी

बाहेरची कापलेली किंवा पक्ष्यांनी कुरतडलेली फळं खाणं टाळा.

लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

संक्रमित रुग्णापासून सुरक्षित अंतर राखा आणि मास्कचा वापर करा.

ज्या भागात व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात जाणं टाळा.

Web Title : निपाह वायरस का खतरा: भारत में मामले, लक्षण और सावधानियां

Web Summary : पश्चिम बंगाल में निपाह वायरस का पता चला, केंद्र ने टीम भेजी। फ्रूट बैट्स से फैलता है, यह खतरनाक है, मृत्यु दर अधिक है और मस्तिष्क पर हमला करता है। रोकथाम में दूषित फलों से बचना, लक्षण दिखने पर तत्काल चिकित्सा सहायता लेना और संक्रमित व्यक्तियों से दूरी बनाए रखना शामिल है।

Web Title : Nipah Virus Alert: Cases in India, Symptoms, and Precautions

Web Summary : Nipah virus detected in West Bengal, prompting a central response team deployment. Spread by fruit bats, it's highly dangerous with a high mortality rate and attacks the brain. Prevention includes avoiding potentially contaminated fruits, seeking immediate medical help if symptoms appear, and maintaining distance from infected individuals.