शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची मोठी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 18:41 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे लक्ष नवीन मतदारांना, विशेषत: तरुणांना जोडण्यावर आहे.

नवी दिली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने येत्या 24 जानेवारीला नवीन मतदार परिषदेची तयारी करत आहे, ज्यामध्ये अंदाजे 50 लाख नवीन मतदारांचे स्वागत केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला व्हर्च्युअली संबोधित करणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे लक्ष नवीन मतदारांना, विशेषत: तरुणांना जोडण्यावर आहे. भाजपा युवा मोर्चा देशभरात 5000 ठिकाणी युवा मतदार परिषदेची तयारी करत आहे. 24 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 लाख तरुण मतदारांना संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. तरुणांच्या विशेषत: पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांच्या भूमिकेबाबत भाजपाने आराखडा तयार केला असून, ही योजना राबविण्याची जबाबदारी युवा मोर्चाकडे देण्यात आली आहे.

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना महत्त्व देऊन भाजपा युवक आघाडी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 24 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 लाख तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांशी संवाद साधतील. याशिवाय तरुण मतदारांशी संवाद साधण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. भाजपा युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष असलेले काही ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या युवा संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनुराग आणि किशन रेड्डी देखील सहभागी होणार आहेत. भाजपा युवक आघाडीच्या वतीने घरोघरी संपर्क अभियान राबविणार आहे. नवीन मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी 21 जानेवारीला सर्व विधानसभा मतदारसंघात रॅली काढण्यात येणार आहेत. जानेवारीअखेर शाळा-महाविद्यालयांमध्ये नवीन मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

तरुणांना आकर्षित करण्याची भाजपाची योजना12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त "यंग व्होटर्स – फेटमेकर्स ऑफ इंडिया" या विषयावर जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 24 जानेवारी रोजी बक्षिसे दिली जातील. या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक योजना आखली आहे. या योजनेंतर्गत भाजपाच्या युवा मोर्चातर्फे तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक