शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

"NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल", नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला

By बाळकृष्ण परब | Updated: September 22, 2020 12:24 IST

कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती.

ठळक मुद्देया सरकारकडे स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाहीशेतकऱ्यांच्य आत्महत्येसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाहीमहसुलासंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव, चीनची घुसखोरी, कृषिविषयक विधेयके यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. केंद्रातील एनडीए म्हणजे नो डाटा अव्हेलेबल, असे नामकरण थरूर यांनी केले आहे.काँग्रेस खासदार शशी थरून यांनी यासंदर्भातील एक कार्टुनसुद्धा ट्विटरवर शेअर केले आहे. त्यात ते म्हणतात . या सरकारकडे स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्य आत्महत्येसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. महसुलासंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. कोरोनामुळे् झालेल्या मृत्यूंचा संशयास्पद आकडा, जीडीपीच्या वाढीबाबतची गोंधळ वाढवणारी आकडेवारी, यामधून सरकारने आपल्या एनडीए या नावाला नवा अर्थ दिला आहे. तो म्हणजे नो डाटा अव्हेलेबल. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झालेल्या मजुरांच्या संदर्भातील आकडेवारी ही सरकारकडे उपलब्ध नाही आहे. संगिता कुमारी देव, भोला सिंह, कलानिधी वीरस्वामी आणि काही अन्य सदस्यांनी लॉकडाऊन दरम्यान हजारे मजुरांचा मृत्यू झाला आहे का आणि जर झाला असेल तर त्याचे विवरण द्या, अशी मागणी केली होती.दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, श्रमिकांचे झालेले मृत्यू सर्वांनी पाहिले आहेत. मात्र सरकारला याची माहिती मिळाली नाही, असा टोल राहुल गांधींनी लगावला. मोी सरकारला लॉकडाऊनदरम्यान, किती प्रवासी मजुरांचा मृ्त्यू झाला आणि किती नोकऱ्या गेल्या याची माहिती नाही, असा टोला लगावला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी