शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 07:41 IST

NDA Government's First Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारात एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदेसेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते.

- संजय शर्मानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारात एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदेसेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते.

सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मंत्रिपदे वाढविण्यात येतील आणि आणखी काही मंत्रालयेही दिली जातील, असे मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगण्यात येत आहे. सर्वाधिक नाराजी राष्ट्रवादी अजित पवार गटाने दर्शवली आहे. प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने त्यांनी कोणतेही मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पटेल यांना मंत्रिपदासाठी सरकारचे १०० दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे शिंदेसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळू शकते, तसेच प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री करण्याची त्यांची मागणीही पूर्ण होऊ शकते. 

जदयू, टीडीपीला आणखी दोन मंत्रिपदे? - मोदी मंत्रिमंडळाच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विस्तारात जनता दल यू आणि तेलगू देसम पक्षाला आणखी दोन केंद्रीय मंत्रिपदे मिळू शकतात. - पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी दिलेले १०० दिवसांचे हे आश्वासन सर्व मित्रपक्षांनी मान्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. - सरकारचे १०० दिवस पूर्ण होत असताना काही नवे पक्षही एनडीएत सामील होऊ शकतात. बीजेडीचाही त्यात समावेश होऊ शकतो.

अधिवेशनादरम्यान समन्वयकाची नियुक्तीसंसदेच्या अधिवेशनादरम्यान एनडीएच्या समन्वयकाची निवड करण्यासह एनडीएची समन्वय समितीही स्थापन केली जाईल. एनडीएच्या समन्वयकपदासाठी टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू आणि जदयू नेते नितीश कुमार हे प्रमुख दावेदार आहेत. ही समिती मित्रपक्षांच्या समस्या सोडविण्याचे काम करेल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार