शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला मोठा धक्का, अखेर उदयनराजेंचा भाजपात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 09:53 IST

शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसलेभाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उदयनराजे भोसले यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  

देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविले. नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या विचारांशी सहमत असल्यामुळे भाजपा प्रवेश केला आहे. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. निस्वार्थ भावेनेतून लोकांच्या हितासाठी भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांनी काल रात्री मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते. 

याचबरोबर, लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्यात यावी, तसेच लोकसभेला दगाफटका झाल्यास राज्यसभेचे सदस्यत्व मिळावे, या दोन अटी उदयनराजे भोसले यांनी भाजपा श्रेष्ठींपुढे ठेवल्या होत्या, त्या मान्य झाल्याने उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली होती. 

दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. साता-यात उदयनराजेप्रेमींनी घेतलेल्या मेळाव्यात राजेंनी भाजपामध्ये जावे, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. उदयनराजेंनी मात्र भाजपा प्रवेशाबाबत कोणतेच जाहीर वक्तव्य केले नव्हते. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साता-यात येऊन उदयनराजेंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेस