मोदींनी कधीच चहा विकला नाही, त्यांना चहावाला नाही तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, सख्ख्या भावाचा दावा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 19:49 IST2022-08-04T19:48:40+5:302022-08-04T19:49:38+5:30

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण चहावाला असल्याचं सांगत असतात. मात्र आता मोदींच्या भावानेच नरेंद्र मोदींचा हा दावा खोडणारं विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांना चहावाला नाही तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, असा सल्ला मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केला आहे.

Narendra Modi has never sold tea, call him not a tea owner but a tea owner's son, Pralhad Modis claims | मोदींनी कधीच चहा विकला नाही, त्यांना चहावाला नाही तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, सख्ख्या भावाचा दावा   

मोदींनी कधीच चहा विकला नाही, त्यांना चहावाला नाही तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, सख्ख्या भावाचा दावा   

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारून आता सव्वा आठ वर्षांचा कालावधी लोटत आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव करत मोदींनी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून दिले होते. त्या निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी चहावाला म्हणून हिणवल्यानंतर मोदींनी आपण चहावाला असल्याचा वारंवार उल्लेख केला होता. तेव्हापासून आपण सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आल्याचं अधोरेखित करण्यासाठी मोदी आपण चहावाला असल्याचं सांगत असतात. मात्र आता मोदींच्या भावानेच नरेंद्र मोदींचा हा दावा खोडणारं विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांना चहावाला नाही तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, असा सल्ला मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे केंद्र सरकारविरोधात जंतर मंतर येते आयोजित आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. हे आंदोलन अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. या फेडरेशनचे प्रल्हाद मोदी उपाध्यक्ष आहेत.

दरम्यान, प्रल्हाद मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रल्हाद मोदी हे त्यांचे बंधू पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी हे चहावाला असण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना चहावाला नाही, तर चहा विकणाऱ्यांचा मुलगा म्हटलं पाहिजे. आमच्या वडीलांनी चहा विकून आम्हा भावंडांचं पालन पोषण केलं होतं, असे प्रल्हाद मोदी म्हणाले.

रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनातही प्रल्हाद मोदी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. माझा भाऊ पंतप्रधान आहे म्हणून मी उपाशी मरू का असा सवाल त्यांनी केला होता.  

Web Title: Narendra Modi has never sold tea, call him not a tea owner but a tea owner's son, Pralhad Modis claims