Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 05:55 IST2026-04-21T05:53:53+5:302026-04-21T05:55:01+5:30

US-Iran Conflict: अमेरिकेच्या नौदलाकडून इराणचे जहाज जप्त, होर्मुझच्या नाकेबंदीवरून तणाव कायम, जलमार्ग लगेच खुला करण्याचे चीनचे आवाहन; दोन आठवड्यांचा युद्धविराम आज संपुष्टात येणार

Donald Trump: Peace deal will be signed today; Iranian delegation will also arrive, what did Trump say? | Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

वॉशिंग्टन/तेहरान: होर्मुझची अमेरिकेने नाकेबंदी केल्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शांतता करार मंगळवारी  पाकिस्तानमध्ये केला जाईल, असे विधान एका मुलाखतीत केले आहे. मात्र, त्याचवेळी युद्धविराम पुढे वाढवण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स पाकिस्तानकडे रवाना झाल्याचे सांगितले होते. मात्र, सोमवारी सकाळी ते व्हाइट हाऊसमध्येच असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते इस्लामाबाद येथे चर्चेसाठी कधी पोहोचणार याबाबत संभ्रम कायम होता. तर दुसरीकडे इराणच्या संसदेचे अध्यक्ष कालिबाफ यांच्या नेतृत्वाखाली इराणचे शिष्टमंडळ मंगळवारी इस्लामाबादमध्ये पोहोचत असल्याचे समजते. होर्मुझमधील नाकेबंदी कायम असून इराणशी संबंधित २७ जहाजांना परत इराणी बंदरांकडे पाठवण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. 

इराणच्या मालवाहू जहाजावर अमेरिकेचा गोळीबार

- रविवारी बंदर अब्बास या इराणच्या बंदराकडे जाणारे आणि अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी ओलांडण्याचा प्रयत्न करणारे इराणचे एक मालवाहू जहाज जप्त केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. या संदर्भातील एक व्हिडिओही अमेरिकेच्या नौदलाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या जहाजाचे नाव ‘तौस्का’ असल्याचे सांगण्यात आले. 

- या मालवाहू जहाजाच्या इंजिन रुमवर अमेरिकेने 'गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर'ने गोळीबार केला. या नंतर जहाजावर सैनिक उतरले आणि त्यांनी जहाजाची झडती घेतली. या घटनेबाबत इराणच्या 'खातम अल-अंबिया' सेंट्रल हेडक्वार्टरने सांगितले की, जहाजावर खलाशांचे कुटुंबीय व मुले असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी इराणने अमेरिकेवर हल्ला केला नाही.

त्वरित चर्चा सुरू करा : चीन

- सोमवारी चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी सौदीचे राजे सलमान यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेत होर्मुझ मार्ग आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा असल्याने तेथे ताबडतोब युद्धविराम व्हायला हवा, असे मत जिनपिंग यांनी व्यक्त केले.

- काही आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांच्या मते, इराणकडून ९० टक्के तेलआयात चीनची असल्याने अमेरिकेने केलेली ही नाकेबंदी इराणची केवळ कोंडी नसून, त्यामागे चीनवर दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे.

‘होर्मुझ टोल फ्री करा’  

ब्रिटनने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या मुक्त आणि विनाशुल्क वाहतुकीसाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. इराणच्या राजवटीला या मार्गासाठी पैसे वसूल करण्याची मुभा देणारा कोणताही तोडगा शाश्वत असू शकत नाही, असे ब्रिटनने म्हटले आहे. जपाननेही ब्रिटनच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 

Web Title : ट्रंप का दावा: ईरान शांति समझौता जल्द, तनाव चरम पर।

Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य में तनाव के बीच, ट्रंप ने पाकिस्तान में ईरान शांति समझौते का दावा किया। ईरानी प्रतिनिधिमंडल वार्ता के लिए पहुंचा। अमेरिकी नौसेना ने ईरानी मालवाहक जहाज जब्त किया; चीन ने युद्धविराम का आग्रह किया।

Web Title : Trump claims Iran peace deal imminent amidst rising tensions.

Web Summary : Amidst Hormuz Strait tensions, Trump claimed an Iran peace deal in Pakistan. An Iranian delegation arrives for talks. US Navy seized Iranian cargo ship; China urges ceasefire.