नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 06:56 IST2026-04-21T06:56:14+5:302026-04-21T06:56:35+5:30

Goregaon NESCO Concert: फरार ड्रग सप्लायरचा शोध सुरू; पत्नी, बहिणीच्या बँक खात्यात वळवली गुन्ह्याची रक्कम

Nesco drug case: Many drug peddlers, 'without tickets' at concerts! | नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!

नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई: गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन केंद्रात दि. ११ एप्रिल रोजी झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका मोठ्या ड्रग्ज सप्लायरकडून अटक आरोपींना इक्स्टसी ड्रग्जचा पुरवठा केल्याचे उघड झाले. आयोजकांनी नियुक्त केलेल्या सेफक्युअर कंपनीच्या सुरक्षारक्षक-बाऊन्सरनी अटक आरोपींव्यतिरिक्त अजूनही अनेक ड्रग्ज पेडलर्सना विदाउट तिकीट कॉन्सर्टमध्ये एन्ट्री दिल्याने ड्रग्ज सिंडीकेटशी आरोपींचा संबंध उघड झाला आहे. दरम्यान, सोमवारी आनंद पटेल (वय, २४), विनीत गेरलानी (वय, २२),शुभ अगरवाल (वय, २२) आणि आयुष साहित्य (वय, २४) यांची पोलिस कोठडी बोरीवली कोर्टाने सोमवार, दि. २३ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार,आरोपी तसेच विद्यार्थ्यांना कॉन्सर्ट दरम्यान मिळालेल्या इक्स्टसी गोळ्या मोठ्या ड्रग्ज सप्लायरकडून आणल्याचे तपासात उघड झाले. आयुष सप्लायरच्या संपर्कात होता जो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. त्याचा ठावठिकाणा आयुषला माहीत असल्याने त्याच्या मदतीने त्याचा शोध पोलीस घेत आहेत. 

आरोपी शुभ, आयुष, विनीत यांनी याच ड्रग्ज सप्लायरच्या पत्नीच्या खात्यावर अमली पदार्थ विक्रीतून आलेले पैसे ट्रान्सफर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. विनीतने आयुषच्या बहिणीच्या खात्यावर कार्यक्रमादरम्यान पैसे ट्रान्सफर केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच अटक आरोपी प्रदीप गुप्ताने नेस्को येथे कार्यक्रमाकरिता आयुष व विनीत यांच्यासह विनातिकीट अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आणखी काही लोकांना विनातिकीट सोडल्याचेही तपासात समोर आले. ज्यांनी कार्यक्रमामध्ये अधिक प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा करत उपस्थितांच्या जीवाशी खेळ केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अटक आरोपींनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा करून ठेवल्याचाही पोलिसांना संशय असून, ड्रग्ज स्मगलिंगसाठी त्यांना इतर काही लोक मदत करत असल्याचाही 
आरोप आहे.

कंपनीचे आधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी!

ड्रग्जचा पुरवठा आयोजकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नसल्याने कार्यक्रमासाठी त्यांनी ज्या ज्या कंपनीला वेगवेगळे कामाचे कंत्राट दिले होते त्या सर्वांची आरोपींसमोर चौकशी करणार असल्याचे अधिकारी म्हणाले.

गुन्ह्याच्या आधी अन् नंतर आर्थिक व्यवहार!

आरोपी यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट मागवून त्याचे विश्लेषण केले असता आनंद, विनीत, शुभ आणि आयुष यांच्यामध्ये गुन्हा घडल्याच्या दहा दिवस आगोदर व गुन्हा घडल्यानंतरही पैशांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाली. तसेच त्यांनी इतर खात्यावरदेखील पैशांचे व्यवहार केल्याचे समोर आल्याने त्या अनुषंगाने आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

Web Title : नेस्को ड्रग्स मामला: ड्रग पेडलर्स बिना टिकट कॉन्सर्ट में, ड्रग सिंडिकेट!

Web Summary : नेस्को कॉन्सर्ट में ड्रग पेडलर्स बिना टिकट घुसे, ड्रग सिंडिकेट का खुलासा। गिरफ्तार आरोपियों को एक सप्लायर से एक्स्टसी मिली। पुलिस ने हिरासत बढ़ाई, अपराध से पहले और बाद के वित्तीय लेनदेन और इवेंट ठेकेदारों की भूमिका की जांच कर रही है।

Web Title : Nesco Drugs Case: Peddlers Entered Concert 'Without Ticket,' Drug Syndicate!

Web Summary : Drug peddlers entered a Nesco concert without tickets, revealing a drug syndicate link. Arrested individuals received ecstasy from a supplier. Police extended custody, investigating financial transactions before and after the crime, and the role of event contractors.