शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या पत्नीचे 4 बॉयफ्रेंड; मलाही मारुन ड्रममध्ये टाकतील', पतीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 19:08 IST

उत्तर प्रदेशातील मेरठ हत्याकांडाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन शरीराचे 15 तुकडे केले अन् ड्रममध्ये भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमील एका व्यक्तीला त्याच्या हत्येची भीती सतावत आहे. अमित कुमार सेन नावाच्या तरुणाने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत आणि ती त्यापैकी एकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. अमितने याला विरोध केला असता पत्नीच्या प्रियकराने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

पत्नीने घर सोडले, प्रियकरासह राहतेग्वाल्हेरच्या मेहंदीवाला सय्यद भागात राहणाऱ्या अमित सेनच्या पत्नीचे लग्नानंतरही अनेक बॉयफ्रेंड होते. सध्या ती राहुल बाथम नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून, तिच्या लहान मुलालाही सोबत घेऊन गेली आहे. अमितचा आरोप आहे की, त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठा मुलगा हर्षचा खून केला आहे. तसेच, त्याला आपल्या हत्येची संशयदेखील आहे.

पोलिसांनी ऐकले नाही, मुख्यमंत्र्यांना आवाहनअमितने अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. नाराज होऊन तो ग्वाल्हेरमधील फूलबाग चौकात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या पोस्टरखाली धरण्यावर बसला. त्याने मुख्यमंत्र्यांना सुरक्षेसाठी आवाहन केले असून, लवकर कारवाई झाली नाही, तर मेरठच्या ड्रम घटनेप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते, असा संशय व्यक्त केला आहे.

पोलीस काय म्हणतात?या प्रकरणी जनकगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सांगतात की, अमित कोणतीही तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेला नाही. त्याने यापूर्वी अर्ज दिला असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल. तर, अमित सांगतो की, त्याने अनेकवेळा पोलिसांची मदत मागितली, पण कोणतीही सुनावणी झाली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार