शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुण्यासह देशातील नऊ शहरांत घरांच्या विक्रीत २५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:35 IST

नव्या गृहनिर्माण प्रकल्पांनाही फटका

नवी दिल्ली : मुंबई, पुण्यासह नऊ शहरांमध्ये  या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या काळात घरांच्या विक्रीत २५ टक्क्यांची घट झाली आहे. ग्राहकांचा थंड प्रतिसाद पाहता नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ४५ टक्क्यांची कपात झाली आहे.

प्रॉपटायगर या संस्थेने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष आले आहेत. या काळात नऊ महत्त्वाच्या शहरांमध्ये फक्त ६५,७९९ घरांची विक्री झाली. जुलै ते सप्टेंबरपर्यंत सात महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांची विक्री घटल्याचा निष्कर्ष अ‍ॅनारॉक व जेएलएल या संस्थांनीही काढला होता. अ‍ॅनारॉकच्या मते घरविक्रीत१८ टक्के तर जेएलएलच्या मते १ टक्का घट झाली होती.

रिअल इनसाइट या स्थावर मालमत्तेबाबतच्या संस्थेने म्हटले आहे की, नऊ शहरांमध्ये गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८८,०७८ घरांची विक्री झाली होती. यंदा मात्र या काळात मोठी घट झाली. गेल्या वर्षी या काळात ६१,६७९ घरबांधणीची नवी कामे सुरू झाली होती. यंदा फक्त ३३,८८३ नवी घरे बांधण्याच्या कामांना प्रारंभ झाला आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नॉयडा (ग्रेटर नॉयडा, यमुना एक्स्प्रेस-वेसहित प्रदेश समाविष्ट), गुरगाव (भिवाडी,धारुहेरा, सोहनासह), बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद या शहरांमधील घरांच्या विक्री व नव्या गृहनिर्माण प्रकल्पांसंदर्भात प्रॉपटायगरने पाहणी केली होती.

स्थिती ‘जैसे थे’च राहील

देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण आहे. बिगरबँकिंग वित्तसंस्था मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. त्यामुळे बिल्डरांना स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी होणारा पतपुरवठा आटला आहे. सणासुदीचे दिवस असूनही अनेक ग्राहकांनी नवी घरे घेण्याचा विचार पुढे ढकलला आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. आगामी तिमाहीमध्येही नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण कमीच राहील, असा अंदाज प्रॉपटायगरसह काही संस्थांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाHomeघर