शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 06:03 IST

तिकिटांचे दरही कमी करण्याची कोर्टाची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मल्टिप्लेक्समधील चित्रपटाच्या तिकिटांसोबतच खाद्यपदार्थ आणि पाण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या जास्तीच्या दरांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. पाण्यासाठी शंभर व कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास लोक मल्टिप्लेक्समध्ये येणे बंद करतील आणि थिएटर रिकामे होतील, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना नोंदवले.

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. विक्रम नाथ व न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने मल्टिप्लेक्समधील तिकीट व खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे घेतले जात असल्याबद्दल सोमवारी नाराजी व्यक्त केली.

तिकिटांचे दरही कमी करण्याची कोर्टाची सूचना

मल्टिप्लेक्समधील तिकिटांचे आणि  अन्नपदार्थांचे दर कमी ठेवा. तसे केले नाही तर चित्रपट पाहणारे लोक चित्रपटगृहांकडे फिरकणार नाहीत. लोकांनी चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपट पाहावा यासाठी दर योग्यरीत्या निश्चित केले पाहिजे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने  नोंदवले. मात्र, खंडपीठाने राज्य सरकार व इतर पक्षांना नोटीस पाठवली असून उच्च न्यायालयाचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने मल्टिप्लेक्समधील तिकिटांच्या किमती २०० रुपयांपेक्षा जास्त ठेवू नये, यासंदर्भात आदेश दिले होते. कर्नाटक राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मल्टिप्लेक्स असोसिएशन व आणखी काही संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, ३० स्पटेंबर रोजीच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने काही कठोर अटींसह राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला होता. त्यामुळे या निर्णयाविरोधात मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : High food prices could shut multiplexes: Supreme Court warns.

Web Summary : Supreme Court expressed concern over high food prices in multiplexes. Overpriced water and coffee may deter moviegoers. The court suggested reducing ticket and food costs to attract audiences, temporarily suspending a high court order. Next hearing on November 25.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcinemaसिनेमा