शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बहुरंगी लढत : पंजाबमध्ये सरकार कोणाचे येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:03 IST

बहुमतासाठी ५९ जागा आवश्यक; मागील पाच निवडणुकांत मतदारांचा स्पष्ट कौल

- बलवंत तक्षक
लाेकमत न्यूज नेटवर्क
चंडीगढ : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारी रोजी  मतदान पार पडल्या पासूनच यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज लावला जात अहे.  राज्यात संमिश्र सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी १० मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला  ५९ जागा मिळणे आवश्यक आहेत.

काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल का?, आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल का?,  किंवा अकाली दल- बसपा आघाडी काही चमत्कार करील का?, अशीही चर्चा आहे. भाजपसाठी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव ढिंढसा यांच्यासोबतची युती किती फायदेशीर ठरते? या सर्व प्रश्नांची उत्तरे १० मार्च रोजीच मिळतील. चर्चा काहीही होत असली तरी पंजाबच्या मतदारांनी गेल्या पाच निवडणुकीत स्पष्ट कौल दिला आहे. त्रिशंकू विधानसभा दिली नाही. तथापि, मतदानानंतर केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की,  सरकार कोणाचे येईल, हे ज्योतिषीच सांगू शकतील. अकाली दलाचे वरिष्ठ नेते बिक्रम सिंग माजीठिया यांनीही असे संकेत दिले होते की,  सरकार स्थापन करण्यासाठी  भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाची मदत घेतली जाऊ शकते.

काँग्रेसच विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व्यक्त करीत आहे; परंतु, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांचे म्हणणे आहे की,  आघाडी सरकारसाठी काँग्रेस आणि आपचा समझोता होऊ शकतो. 

ज्या पक्षाचे जास्त आमदार,  त्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. 
वास्तविक पाहता पंजाबमध्ये यावेळी एक विशिष्ट लाट नव्हती.  मालवामध्ये सत्ता परिवर्तनासाठी मतदानाचा जोर दिसला आणि  दोआबामध्ये मतदान साधारण झाले. मतदानाच्या टक्केवारीत जेव्हाही बदल झाला, तेव्हा पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे, हे विशेष. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास नाईलाजाने आघाडी स्थापन करावी लागेल, एवढे मात्र खरे आहे

कोण आहेत मैदानात?
पंजाबमध्ये अगोदर काँग्रेस आणि अकाली-भाजप आघाडीत थेट लढत होत असे; यावेळी बहुरंगी लढत होती. यावेळी अकाली दल आणि भाजपने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. अकाली दलाने बसपासोबत, तर भाजपाचे अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि ढिंढसा यांच्या संयुक्त अकाली दलासोबत आघाडी केली आहे.  दुसरीकडे शेतकऱ्यांच्या २२ संघटनांचा संयुक्त समाज मोर्चाही यावेळी निवडणुकीत मैदानात उतरला आहे.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२