शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

माय-लेकराच्या नात्याला काळीमा, महिलेकडून मुलासोबतच्या अश्लील डान्सचा व्हिडिओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:55 AM

महिलेने केवळ सोशल मीडियावर लाईक्स मिळावे, चर्चा व्हावी यासाठी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासली आहे. आपले फॉर्लवर्स वाढविण्यासाठी या महिलेनं केलेला तमाशा नेटीझन्सला अजिबात आवडला नाही

ठळक मुद्देदिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संबंधित महिला आणि त्यांच्या मुलाचे 4 फोटो ब्लर करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या महिलेला इन्स्टाग्रामवर 1.60 लाख फॉलोवर्स आहेत.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटसाठी लोकं क्रेझी झाल्याचं अनेकदा आपण पाहिलं आहे. सोशल मीडियावरुन आपली ओळख निर्माण व्हावी, यासाठी अनेक सेलिब्रिटी, मॉडेल किंवा अभिनेत्री हॉट फोटो शेअर करतात. हॉट व्हिडिओही अनेकदा बनवून ते शेअर केले जातात. मात्र, आता एका महिलेनं चक्क आपल्या अल्पवयीन मुलासोबतच हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरुन, दिल्लीमहिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या महिलेला नोटीस जारी केली आहे. 

महिलेने केवळ सोशल मीडियावर लाईक्स मिळावे, चर्चा व्हावी यासाठी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासली आहे. आपले फॉर्लवर्स वाढविण्यासाठी या महिलेनं केलेला तमाशा नेटीझन्सला अजिबात आवडला नाही. अनेकांनी या महिलेला ट्रोल केलंय. तर, महिला आयोगाने या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संबंधित महिला आणि त्यांच्या मुलाचे 4 फोटो ब्लर करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या महिलेला इन्स्टाग्रामवर 1.60 लाख फॉलोवर्स आहेत. या महिलेने काही दिवसांपूर्वी आपल्या मुलासोबत अश्लील गाण्यावर डान्स केलाचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, टीका झाल्यानंतर तो व्हिडिओ डिलिट केला आहे. स्वाती माहिवाल यांनी या महिलेची ओळख सांगितली नाही. पण, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे सांगितले आहे. 

आयोगाच्या अध्यक्षांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, लहान मुलाला महिलेकडून चुकीची शिकवण देण्यात येत आहे. आत्ताच ही महिला आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासत आहे, जेव्हा हा मुलगा मोठा होईल, तेव्हा तो आपल्या आईकडे कुठल्या नजरेतून पाहिल, असा प्रश्न तक्रारीत विचारण्यात आला आहे. तसेच, हा प्रकार असाच घडत राहिला, तर भविष्यात मुलाची मानसिकता गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे जाईल. त्यामुळे, पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करुन, मुलाचे समुपदेशन करावे, असे मालीवाल यांनी म्हटले आहे. 

आयोग महिलाविरोधी नाही

महिला आयोग सोशल मीडियाविरुद्ध किंवा महिलाविरोधी नाही. महिलांच्या संरक्षणासाठीच हा आयोग आहे. सोशल मीडियातून अनेक महिला आपली कला सादर करतात. मात्र, ज्या महिलांकडून असे सामाजिक वातावरण कलुषित करणारे कृत्य घडत असेल, त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे, असे माहिवाल यांनी म्हटलं आहे. तसेच, सोशल मीडियावरील ते व्हिडिओ तात्काळ हटविण्याचेही त्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :WomenमहिलाViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरलdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी