शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

"भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 16:51 IST

Sakshi Maharaj : देशाच्या लोकसंख्येविषयी बोलताना वाढत्या लोकसंख्येच्या चाचणीसाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

कानपूर - भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. "भारतातपाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लीम, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. बागपतमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

"सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 32 कोटी आहे. तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या 20 कोटींपर्यंत पोहचली आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्याक दर्जा तत्काळ प्रभावाने संपुष्टात यावा" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. तसेच देशाच्या लोकसंख्येविषयी बोलताना वाढत्या लोकसंख्येच्या चाचणीसाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावरून त्यांनी इतर पक्षांवर निशाणा साधला आहे. सरकार कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यास तयार आहे. राम मंदिराप्रमाणेच काँग्रेस आणि इतर विरोधी राजकीय पक्षांनी कृषी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायला हवी. भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवली जात आहे असं देखील साक्षी महाराजांनी म्हटलं आहे.  देशातील इतर राज्यांप्रमाणेच योगी सरकारनेही उत्तर प्रदेशात 'लव्ह जिहाद'विरूद्ध कायदा आणण्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. दरम्यान, याविषयी बोलताना याआधी लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींची बोली लावली जाते, असं विधान साक्षी महाराज यांनी केलं होतं.

लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावली जाते बोली - साक्षी महाराज

"लव्ह हा एक चांगला शब्द आहे. लव्ह प्रेम विवाहाची परंपरा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हापासून सुरू आहे. यात कोणालाही आक्षेप नाही. मात्र, ज्यावेळी जिहाद जोडला जातो, त्यावेळी ते विषबाधा होते. लव्ह जिहाद हिंदूच्या मुलींना खोटी नावे ठेवून फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून दहशतवादी जन्माला घातला जातो आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते."  याचबरोबर, प्रेम विवाह 99 टक्के यशस्वी असतात, पण लव्ह जिहाद 99 टक्के अपयशी ठरतात. तर लव्ह जिहादचे पैसे परदेशातून येतात. जिथे कट्टर हिंदूच्या मुलींची किंमत 11 लाख रुपये आहे. ब्राह्मण ठाकूर आणि ओबीसी मुलींच्या वेगवेगळ्या किंमती निश्चित आहेत. तसेच, मदरसे व मशिदीमधून हे चालविले जाते, असा दावा साक्षी महाराज यांनी केला होता.

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारतMuslimमुस्लीम