शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’

By admin | Updated: January 14, 2015 05:17 IST

मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली

नवी दिल्ली : मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली. मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन आणि अन्य वटहुकुमांना जोरदार विरोध करण्याचा निर्धार हे मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचे वैशिष्ट्य राहिले. मात्र पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावरील जबाबदारीच्या विस्ताराचा विषय या बैठकीत निघालाच नाही.बैठकीचा प्रारंभ करतानाच सोनिया यांनी मोदी सरकारवर सडेतोड टीका केली. संपुआ सरकार घटनात्मक मत अजमावत निर्णय घेत होते. वटहुकूम हा न्यायालयीन प्रक्रियेतील अखेरचा उपाय ठरत असताना मोदी सरकार मात्र सुप्रशासनाच्या नावाखाली वटहुकुमाचा धोकायदायक वापर करीत आहे, असे त्या म्हणाल्या. यापूर्वीच्या संपुआ सरकारने भूसंपादन कायदा दीर्घ चर्चा आणि सल्लामसलत करून आणला होता़ मोदी सरकारने त्यात हवी ती दुरुस्ती घडवून आणण्यासाठी वटहुकुमाचा आधार घेतला आहे. ऐतिहासिक भूसंपादन विधेयकाची पूर्णपणे वाट लावत ब्रिटिशांनी पारित केलेला कायदा मागील दाराने आणला आहे. वटहुकूम आणण्याची एवढी घाई का? त्यामागे छुपा हेतू असल्याचा प्रश्न उपस्थित होतो. कोळसा खाणींसंबंधी वटहुकुमामुळे कोळसा खाणींच्या राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे, असेही त्या म्हणाल्या.