मित्राचा विवाहितेवर बलात्कार शाळकरी मुलगी गर्भवती : सावत्र पित्याचे कुकर्म नागपूर : विवाहित महिलेला रुपये उधार देण्याच्या बहाण्याने एका आरोपीने सीताबर्डीत बोलवून

By Admin | Updated: February 20, 2016 00:07 IST2016-02-20T00:07:05+5:302016-02-20T00:07:05+5:30

सीताबर्डीत दाखल झालेल्या प्रकरणातील पीडीत महिला (वय २४) काटोल तालुक्यातील रहिवासी आहे. तिचा पती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला भेटण्यासाठी ती सोमवारी नागपुरात आली होती. बुटीबोरीचा तिचा कथित मित्र सोनू बागडे तिला भेटला. पैशाची चणचण असल्यामुळे महिलेने त्याला एक हजार रुपये उधार मागितले. ते देतो, असे सांगून आरोपीने तिला महाराज बागजवळ बोलवले. तेथे तिला शीतपेय पाजले. त्यानंतर गावाकडे सोडतो, असे सांगून एका ऑटोत बसविले. रात्री १० च्या सुमारास महिला शुद्धीवर आली. त्यावेळी ती गोरेवाड्याकडे होती. तिने गावाकडे जाण्यासाठी घाई केली तेव्हा आरोपी सोनू बागडेने तिला काटोल नाक्याजवळ पायी नेले. तेथून ती गावाला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंघोळ करीत असताना तिला शरीरावर ओरखडे दिसले. नंतर नको त्या जागी दुखत असल्याने आरोपी बागडेने नशेचे औषध

Mitra's rape rape, school girl pregnant: Saif's father's misdeed, Nagpur: The accused married a woman accused of lending money to a married woman | मित्राचा विवाहितेवर बलात्कार शाळकरी मुलगी गर्भवती : सावत्र पित्याचे कुकर्म नागपूर : विवाहित महिलेला रुपये उधार देण्याच्या बहाण्याने एका आरोपीने सीताबर्डीत बोलवून

मित्राचा विवाहितेवर बलात्कार शाळकरी मुलगी गर्भवती : सावत्र पित्याचे कुकर्म नागपूर : विवाहित महिलेला रुपये उधार देण्याच्या बहाण्याने एका आरोपीने सीताबर्डीत बोलवून

ताबर्डीत दाखल झालेल्या प्रकरणातील पीडीत महिला (वय २४) काटोल तालुक्यातील रहिवासी आहे. तिचा पती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला भेटण्यासाठी ती सोमवारी नागपुरात आली होती. बुटीबोरीचा तिचा कथित मित्र सोनू बागडे तिला भेटला. पैशाची चणचण असल्यामुळे महिलेने त्याला एक हजार रुपये उधार मागितले. ते देतो, असे सांगून आरोपीने तिला महाराज बागजवळ बोलवले. तेथे तिला शीतपेय पाजले. त्यानंतर गावाकडे सोडतो, असे सांगून एका ऑटोत बसविले. रात्री १० च्या सुमारास महिला शुद्धीवर आली. त्यावेळी ती गोरेवाड्याकडे होती. तिने गावाकडे जाण्यासाठी घाई केली तेव्हा आरोपी सोनू बागडेने तिला काटोल नाक्याजवळ पायी नेले. तेथून ती गावाला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंघोळ करीत असताना तिला शरीरावर ओरखडे दिसले. नंतर नको त्या जागी दुखत असल्याने आरोपी बागडेने नशेचे औषध पाजून बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. तिने बराच विचारविमर्श केल्यानंतर गुरुवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक गावंडे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.
--
झिंगाबाई टाकळी, गोधनीतील पीडित मुलगी १४ वर्षांची असून, आठवीची विद्यार्थिनी आहे. तिची बहीण ११ वीत शिकते.आईने दोन वर्षांपूर्वी चंद्रशेखर तभाने नामक नराधमाचा आसरा घेतला. तो पेंटिंगची कामे करतो. गोधनीच्या बापूनगरात एका भाड्याच्या घरात ते राहात होते. वर्षभरापर्वी बहीण कॉलेजला तर आई कामाला गेली असताना सावत्र पिता चंद्रशेखर याने पीडित मुलीवर अत्याचार केला. धाक दाखवल्याने मुलगी गप्प बसली. त्यामुळे निर्ढावलेला हा नराधम मुलीवर नेहमी अत्याचार करू लागला. मुलीतील नैसर्गिक बदल लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी आईने तिला वर्धेला नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे डॉक्टरने सांगितले. अवघ्या १४ व्या वर्षीच सात महिन्यांची गर्भवती असलेल्या या मुलीवर सावत्र पित्यानेच अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर डॉक्टरांच्या सूचनेवरून महिलेने मानकापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्याची माहिती कळताच आरोपी पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---

Web Title: Mitra's rape rape, school girl pregnant: Saif's father's misdeed, Nagpur: The accused married a woman accused of lending money to a married woman