स्टोव्हचा भडका होऊन भाजल्याने विवाहितेचा मृत्यू

By Admin | Updated: January 6, 2015 00:52 IST2015-01-05T00:59:13+5:302015-01-06T00:52:07+5:30

नाशिक - स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका होऊन भाजल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटीतील सावित्रीबाई झोपडप˜ीत काल घडली़

Marital death due to stirred by stove | स्टोव्हचा भडका होऊन भाजल्याने विवाहितेचा मृत्यू

स्टोव्हचा भडका होऊन भाजल्याने विवाहितेचा मृत्यू

नाशिक - स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका होऊन भाजल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटीतील सावित्रीबाई झोपडप˜ीत काल घडली़
राधाबाई युवराज जाधव (वय २५,रा़ सावित्रीबाई झोपडप˜ी, मुळचे कन्नड, औरंगाबाद) असे या घटनेत मत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे़ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता राधाबाई या स्वंयपाक करत असताना स्टोव्हचा भडका झाला़ यामुळे त्यांच्या अंगावरील कपड्यांनीही पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या़ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़

Web Title: Marital death due to stirred by stove