शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कडाडली टंचाईची वीज; सव्वा लाख कोटींच्या थकबाकीमुळे तोट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 07:25 IST

देशातील सर्वांत मोठा कोळसा उत्पादक असलेल्या कोल इंडिया लिमिटेडचे २०१८-१९ मध्ये  कोळशाचे उत्पादन ६०६ दशलक्ष टन होते. २०१९-२० यात घट होऊन ते ६०२ दशलक्ष टनावर आले.

शरद गुप्ता

नवी दिल्ली :  एकीकडे देशभरातील नागरिक तळपत्या उन्हाने कासावीस झाले आहेत. त्यात विजेची मागणीही वाढत आहे, तर दुसरीकडे कोळशाच्या टंचाईमुळे अनेक राज्यांना वीज कपातीला सामोरे जावे लागत आहे. अनेक राज्यांना गरजेपक्षा १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत कमी वीज मिळत आहे. देशांतील ७० टक्के वीजनिर्मिती कोळशावर चालणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्रांत तयार होते. गेल्या चार वर्षांत देशांतील कोळसा उत्पादनात सातत्याने घट होत आहे. परिणामी, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून ओढवलेले विजेचे संकट दूर झालेले नाही.

देशातील सर्वांत मोठा कोळसा उत्पादक असलेल्या कोल इंडिया लिमिटेडचे २०१८-१९ मध्ये  कोळशाचे उत्पादन ६०६ दशलक्ष टन होते. २०१९-२० यात घट होऊन ते ६०२ दशलक्ष टनावर आले. २०२०-२१ मध्ये आणखी घट होऊन ५९६ दशलक्ष टन झाले.  आयात केल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण कोळशावर थोडीफार आशा होती; परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे तीही मावळली. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचा भाव ३५ टक्के वाढला आहे.  त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागात आयात केलेल्या कोळशावर चालणारे औष्णिक विद्युत केंद्राची अनेक संयंत्रे ठप्प पडली आहेत.

सव्वा लाख कोटींच्या थकबाकीमुळे तोट्यात
वीज संकटामागचे मुख्य कारण म्हणजे राज्यांच्या वीज वितरण महामंडळे (डिस्कॉम) २१ टक्के तोट्यात असणे. केंद्राने नोव्हेंबर २०१५ मध्ये उज्ज्वला डिस्कॉम एश्युरन्स योजना (उदय) सुरू केली; परंतु आजही राज्यांच्या वितरण कंपन्यांकडे १,२३,००० कोटींची थकबाकी आहे. त्यांनी कोल इंडिया लिमिटेडची थकबाकी चुकती न केल्याने नवीन खदानींचा विस्तार करण्यासाठी कोल इंडियाकडे पैसा नाही.

गंगाजळी रिती, उरले फक्त ८ हजार कोटी 

२०१५ मध्ये कोल इंडियाच्या खात्यात ३५ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त शिल्लक होती. त्याचा वापर नवीन खदानींऐवजी लाभांश वाटप करण्यासाठी केला. २०१९ मध्ये कोल इंडियाकडे फक्त ८ हजार कोटी रुपयेच उरले होते. - अनिल स्वरूप, माजी कोळसा सचिव 

पुरवठ्यासाठी ६०० हून अधिक प्रवासी ट्रेन रद्द 

आज रेल्वे सर्व विद्युत निर्मिती केंद्रांपर्यंत थेट कोळशाचा पुरवठा करण्यासाठी ६०० हून अधिक  प्रवासी ट्रेन रद्द केल्या असल्या तरी अनेक वर्षांपासून कोळसा उद्योग मालवाहू वाघिणीच्या (वॅगन) संकटाला सामोरे जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ओढवलेल्या संकटामुळे  सरकारने आता एक लाख  कोळसा वॅगन खरेदीचा आदेश जारी केला आहे.

देशावर असेच संकट २०१४ मध्येही 
असेच संकट २०१४ मध्ये देशाने अनुभवले होते. तेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार आले असताना कोल इंडिया लिमिटेडने २०१४-१५ मध्ये कोळशाचे उत्पादन ३४ दशलक्ष टनाने (८ टक्के) वाढविले. २०१५-१६ मध्येही  उत्पादन ४४ दशलक्ष टनाने (१३ टक्के) वाढविले; परंतु २०१७ नंतर एक वर्षभर कोल इंडिया लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालकपद (सीएमडी) रिक्त असल्याने कोळसा उत्पादनावर परिणाम झाला.

इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा 
वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा आयातीचा निर्णय घेतला आहे. ‘महाजेनको’च्या निविदेला मंजुरी देत इंडोनेशियातील कंपनी २० मे पासून कोळशाचा पुरवठा करणार आहे. हा कोळसा देशातील कोळशाच्या तुलनेत अडीच पट अधिक महाग आहे.             

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट