शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

...तर 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, यूपीत मनीष सिसोदियांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 3:37 PM

manish sisodia : आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी कोणतेही वीज शुल्क भरावे लागणार नाही, असेही मनीष सिसोदिया म्हणाले.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. मनीष सिसोदिया उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जर उत्तर प्रदेशच्या लोकांनी आम आदमी पार्टीला (आप) मतदान केले तर आप सरकारकडून स्थापनेच्या 24 तासांच्या आत घरगुती वीज मोफत दिली जाईल, ज्याप्रमाणे दिल्लीतील केजरीवाल सरकारने केले आहे, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. (manish sisodia promises free electricity to uttar pradesh if aap comes to power)

घरगुती वापरासाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करताना मनीष सिसोदिया म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यकाळात लोक महागड्या वीज बिलांमुळे त्रस्त आहेत आणि विशेषतः शेतकरी खुश नाहीत, त्यांना महाग वीज मिळत आहे. त्यामुळे तुमचे मत ही समस्या सोडवू शकते. तुम्ही आम्हाला मत दिल्यास ही समस्या सुटेल.

आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी कोणतेही वीज शुल्क भरावे लागणार नाही, असेही मनीष सिसोदिया म्हणाले. तसेच, कितीही विजेची गरज असली तरी शेतकऱ्यांचे वीज बिल शून्यावर येईल. उत्तर प्रदेशात ५ ते १० हजार कमवणाऱ्या लोकांची बिल लाखोंच्या घरात येत आहे. त्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत, असे शेकडो लोक आहेत,  ज्यांना अशाप्रकारे त्रास होत आहे, अले मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

याचबरोबर, एक व्हिडिओ जारी करताना मनीष सिसोदिया यांनी आपले संपूर्ण म्हणणे मांडले. उत्तर प्रदेशातील अनेक प्रकरणांचा हवाला देत, वीज बिलांमुळे लोक कसे आत्महत्या करत आहेत, ते सांगितले. तसेच, केवळ वीज बिलांची समस्याच नाही तर दिल्लीतील वीज कपातीची समस्याही दूर झाली आहे. उत्तर प्रदेशातही केजरीवाल सरकारचा हाच पराक्रम आम आदमी पार्टी करून दाखवेल, असे मनीष सिसोदिया म्हणाले.

केजरीवाल तिसऱ्यांदा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजकगेल्या शनिवारी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ३४ सदस्यांनी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकपदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. पंकज गुप्ता आणि एन. डी. गुप्ता यांची अनुक्रमे  सचिव आणि  कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाच वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAAPआपPoliticsराजकारण