शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी सुनीता विल्यम्स यांना देत होत्या शुभेच्छा, तेव्हा घडलं असं काही... सभागृहात पिकला हशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:03 IST

Mamata Banerjee News: पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतातूनही विविध प्रमुख नेत्यांनी सुनिता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनीही सुनीता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शुभेच्चा देताना ममता बॅनर्जींकडून झालेल्या एका चुकीमुळे सभागृहात हशा पिकला.

मागच्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकून असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय वेळेनुसार आज पहाटे त्यांना घेऊन ड्रॅगन स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरलं. त्यानंतर आता सुनीता विल्यम्स यांना जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतातूनही विविध प्रमुख नेत्यांनी सुनिता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनीही सुनीता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शुभेच्चा देताना ममता बॅनर्जींकडून झालेल्या एका चुकीमुळे सभागृहात हशा पिकला.

त्याचं झालं असं की, ममता बॅनर्जी यांनी सुनीता विल्यम्स यांचं सुखरूप पृथ्वीवर आल्याबद्दल अभिनंदन केलं. तसेच त्यांना भारतातर्फे सन्मानित करण्याची मागणी केली. मात्र भाषणादरम्यान, ममता बॅनर्जी यांनी चुकून सुनीता विल्यम्स यांचा उल्लेख सुनीता चावला असा केला. मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या या चुकीमुळे सभागृहात खसखस पिकली. सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांच्या नावांची ममता बॅनर्जी यांच्याकडून गडबड झाली आणि त्यांनी चुकून सुनिता विल्यम्स ऐवजी चावला असा उल्लेख केला. मात्र त्यांनी त्वरित आपली चूक सुधारली. 

दरम्यान, सुनिता विल्यम्स यांचं कौतुक करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी विज्ञान विषयक खूप वाचन करते. अंतराळातून माघारी येणं  हे खूप कठीण असंत, याची मला कल्पना आहे. विमान उडतं आणि त्यात काही दोष निर्माण झाल्यास ते खाली येतं हे आपण अनेकदा पाहिलंय. मात्र अंतराळातून माघारी येणं कठीण आहे. अशा परिस्थिती अपघात होण्याचीही शक्यता असते. कल्पना चावला यांच्यासोबत अशी दुर्घटना घडली होती. मात्र सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे परतले आहेत. त्यासाठी आम्ही भारत आणि संपूर्ण जगाकडून बचाव पथकाचे आभार मानतो.  

टॅग्स :Sunita Williamsसुनीता विल्यम्सMamata Banerjeeममता बॅनर्जीNASAनासाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल