दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी 'तो' बनला बाईक चोर

By Admin | Updated: July 11, 2016 13:31 IST2016-07-11T13:24:28+5:302016-07-11T13:31:08+5:30

दोन विवाह केल्यानंतर दोन पत्नींचा खर्च भागवण्यासाठी बाईक चोरी करणा-या आरोपीला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे.

To make the cost of two wives, 'he' became a 'bicycle thief' | दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी 'तो' बनला बाईक चोर

दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी 'तो' बनला बाईक चोर

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. ११ - दोन विवाह केल्यानंतर दोन पत्नींचा खर्च भागवण्यासाठी बाईक चोरी करणा-या आरोपीला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. मुरली रामराव असे आरोपीचे नाव असून तो पेशाने हमाल आहे. हमालींमधून मिळणा-या पैशातून दोन कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने त्याने बाईक चोरीला दुसरा धंदा बनवले होते. 
 
मुरली त्याच्या दोन पत्नींपैकी एकीला भेटायला जायचा त्यावेळी तो जाताना बीएमटीसी बसने जायचा पण येताना त्याच्याकडे चोरलेली बाईक असायची. मुरलीने आतापर्यंत शहराच्या विविध भागातून २५ पेक्षा जास्त बाईकची चोरी करुन त्या बाईक विकल्या. या चोरीच्या धंद्यामध्ये मुरलीचा कोणी दुसरा भागीदार नव्हता. तो स्वत:च हे काम करायचा. 
 
पाच जुलैला मंत्री मॉल समोरुन होंडा डियो बाईक चोरताना त्याला पकडले. त्याच्याकडून १५ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. अटक केल्यानंतर मुरलीने चौकशीत दोन कुटुंबांचा खर्च भागवण्यासाठी चोरी करत होतो असे सांगितले. जेव्हा मुरलीच्या बायका त्याला बाईकबद्दल विचारायच्या तेव्हा तो मित्राच्या बाईक आहे असे त्यांना सांगायचा.  

Web Title: To make the cost of two wives, 'he' became a 'bicycle thief'