Mahua Moitra : Video - "जो TMC सोबत नाही, तो बंगाली नाही..."; महुआ मोइत्रांच्या विधानाने राजकारण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:38 IST2026-03-09T11:37:55+5:302026-03-09T11:38:52+5:30

Mahua Moitra And BJP : तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांचं एक विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Mahua Moitra controversial statement TMC bengali identity bjp reaction | Mahua Moitra : Video - "जो TMC सोबत नाही, तो बंगाली नाही..."; महुआ मोइत्रांच्या विधानाने राजकारण तापलं

Mahua Moitra : Video - "जो TMC सोबत नाही, तो बंगाली नाही..."; महुआ मोइत्रांच्या विधानाने राजकारण तापलं

तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांचं एक विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीतच महुआ मोइत्रा यांनी "जो टीएमसीसोबत नाही, तो बंगाली नाही आणि त्याला बंगालमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही" असं म्हटलं आहे. यानंतर भाजपाने या विधानावरून महुआ मोइत्रा यांच्यासह संपूर्ण तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. "जे टीएमसीची विचारधारा मानत नाहीत, ते बंगाली नाहीत का?" असा सवाल भाजपाने विचारला आहे.

पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना महुआ मोइत्रा म्हणाल्या, "आज मला हे स्पष्ट करायचं आहे की, जो कोणी ममता बॅनर्जी यांच्यासोबत उभा नाही, तो स्वतःला बंगाली म्हणवून घेण्यास पात्र नाही. अशा लोकांना बंगालच्या भूमीवर राहण्याचा कोणताही हक्क नाही." महुआ मोइत्रा हे विधान करत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा मंचावर उपस्थित होत्या. या विधानानंतर विरोधी पक्षांनी टीएमसीवर 'हुकूमशाही' मानसिकतेचा आरोप केला आहे.

महुआ मोइत्रा यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाने याला 'लोकशाहीची हत्या' असं संबोधलं असून, टीएमसी आता उघडपणे अशा लोकांना धमकावत आहे जे त्यांच्या विचारधारेशी सहमत नाहीत, असा आरोप केला आहे. भाजपाने असा युक्तिवाद केला की, "जर टीएमसीसोबत नसलेले लोक 'बंगाली' नाहीत, तर २०२४ च्या निवडणुकीत टीएमसीला मतदान न करणारे ५५% मतदार बंगाली नाहीत का? त्यांनी आता बंगालमध्ये राहण्याचा अधिकार गमावला आहे का?"

भाजपाने पुढे आरोप केला की, "एकीकडे महुआ मोइत्रा 'बंगाली' असण्याचं प्रमाणपत्र वाटत आहेत, तर दुसरीकडे टीएमसीने शत्रुघ्न सिन्हा, कीर्ति आझाद आणि युसूफ पठाण यांसारख्या बंगाली नसलेल्या 'बाहेरच्या' व्यक्तींना बंगालमधून खासदार बनवलं आहे. इतकंच नाही तर पक्षाची यंत्रणा प्रतीक जैन यांच्यासारखी बाहेरील व्यक्ती चालवत आहे." याशिवाय भाजपाने विविध मुद्द्यांवरून टीएमसीला धारेवर धरलं आहे.

Web Title : महुआ मोइत्रा के बयान पर विवाद: टीएमसी ने बंगाली पहचान को परिभाषित किया।

Web Summary : महुआ मोइत्रा के बयान, "जो टीएमसी के साथ नहीं हैं, वे बंगाली नहीं हैं," से आक्रोश फैल गया। बीजेपी ने टीएमसी की आलोचना करते हुए सवाल किया कि क्या असहमत मतदाता बंगाली नहीं हैं। तानाशाही और पाखंड के आरोप लगे, जिसमें टीएमसी द्वारा चुने गए गैर-बंगाली सांसदों का हवाला दिया गया।

Web Title : Controversy erupts over Mahua Moitra's statement: TMC defines Bengali identity.

Web Summary : Mahua Moitra's statement, "Those not with TMC are not Bengali," sparked outrage. BJP criticized TMC, questioning if dissenting voters aren't Bengali. Accusations of dictatorship and hypocrisy followed, citing non-Bengali MPs elected by TMC.