शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल बनल्या कमला, महाकुंभमेळ्यातह सहभागी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:07 IST

Mahakumbhmela 2025: ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ह्या सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी आपलं गोत्र प्रदान केलं आहे.

हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभमेळ्याला प्रयागराज येथे आजपासून सुरुवात झाली आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ह्या सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी आपलं गोत्र प्रदान केलं आहे.

लॉरेन पॉवेल यांच्या भारत दौऱ्याबाबत माहिती देताना त्यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी कैलाशानंदजी महाराज यांनी सांगितले की, आम्ही लॉरेन पॉवेल यांना कमला हे हिंदू नाव दिलं आहे. त्या इथे आपल्या गुरुजींना भेटण्यासाठी येणार आहेत. आम्ही त्यांचं कमला असं नामकरण केलं आहे. त्या आमच्यासाठी मुलीसारख्या आहेत. त्या दुसऱ्यांदा भारताल आल्या आहेत. त्या खाजगी कार्यक्रमासाठी आल्या असून, त्या काही दिवस येथे प्रवास करतील.  

स्वामी कैलाशानंद महाराज यांनी पुढे सांगितले की, लॉरेन पॉवेल यांना त्यांच्या गुरूचं गोत्र मिळाल्यानंतर त्यांना कमला हे नवं नाव देण्यात आलं आहे. लॉरेन पॉवेल यांना सनातन धर्मामध्ये रुची आहे. तसेच त्यांना अच्युत हे गोत्र देण्यात आलं आहे.  लॉरेन ह्या ध्यान धारण करण्यासाठी भारतात आल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील सदस्यांपैकी एक असलेल्या लॉरेन ह्या कुंभमेळ्यादरम्यान त्या संन्याशाप्रमाणे राहतील. तसेच त्या अमृत स्नान आणि मौनी अमावस्येदरम्यान, त्या स्नान करतील.

लॉरेन पॉवेल ह्या सध्या वाराणसीमध्ये आहेत. तसेच त्या महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी प्रयागराज येथे पोहोचणार आहेत. त्या त्यांचे गुरू आणि निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कैलाानंद यांच्या शिबिरात राहतील. तसेच २९ जानेवारीपर्यंत कुंभमेळ्यातील विविध विधींपर्यंत सहभागी होतील. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाSteve Jobsस्टीव्ह जॉब्सFamilyपरिवारHinduismहिंदुइझमIndiaभारत