शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभाची सांगता; 45 दिवसांत 66 कोटी भाविकांचे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 22:11 IST

Mahakumbh 2025: आज महाशिवरात्रीच्या स्नानाने प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ 2025 ची सांगता झाली.

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशची सांस्कृतिक राजधानी प्रयागराजमध्ये 45 दिवसांपासून पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाशिवरात्रीच्या स्नानाने या महाकुंभाची सांगता झाली. इतर दिवसांप्रमाणे आजही कोट्यवधी भाविकांनी महाकुंभात येऊन त्रिवेणी संगमात स्नान केले. विशेष म्हणजे, आज आलेल्या भाविकांना भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांनी ‘महा सॅल्यूट’ दिला. सरकारी आकडेवारीनुसार, या 45 दिवसांत सुमारे 66 कोटी भाविकांनी त्रिवणणी संगमात पवित्र स्नान केले.

20 लाखांहून अधिक लोकांनी कल्पवास केलायावेळी महाकुंभात 20 लाखांहून अधिक लोकांनी कल्पवास केला. हे सर्व कल्पवासी पौष पौर्णिमेच्या आधी येथे पोहोचले होते, तर सर्व नियम आणि आचरण पाळून मौनी अमावस्येपर्यंत महाकुंभात मुक्काम केला. या काळात लोकांनी आपला बराचसा वेळ भजन, कीर्तन आणि ध्यानात घालवला. मौनी अमावस्येलाच कल्पातील सर्व रहिवासी आपापल्या घरी गेले. त्यांच्यासोबतच ऋषी-मुनींचे सर्व 13 आखाडेही मौनी अमावस्येला स्नान करून निघून गेले.

50 हून अधिक देशांतून भाविक आले होतेमहाशिवरात्रीला महाकुंभात स्नान करण्यासाठी दोन दिवस आधीच गर्दी जमू लागली होती. पहाटे साडेतीन वाजल्यापासून लोकांनी आंघोळ करण्यास सुरुवात केली. मेळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दुपारी 4 वाजेपर्यंत 1.32 कोटी भाविकांनी स्नान केले होते, तर 20 लाखांहून अधिक भाविक स्नानासाठी पुढे जाताना दिसत होते. यावेळी नेहमीप्रमाणे सर्वच घाटांवर मेळा प्रशासनाने भाविकांवर पुष्पवृष्टी केली. रिपोर्टनुसार, नेपाळ, भूतान व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, जपानसह 50 हून अधिक देशांतील लोक महाकंभात स्नान करण्यासाठी आले होते. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश