शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
4
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
5
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
6
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
7
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
8
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
9
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
10
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
11
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
12
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
13
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
14
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
15
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
16
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
17
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
18
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
19
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
20
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 8:15 PM

भोपाळला परतण्याच्या तयारीत असलेले आमदार विमानतळावरुन माघारी; काँग्रेसला मोठा धक्का

ठळक मुद्देभोपाळला परतण्यासाठी निघालेले आमदार विमानतळावरुन माघारीआमदारकीचा राजीनामा दिलेल्या सदस्यांचा बंगळुरूतला मुक्काम वाढलाबंगळुरूच्या विमानतळावर पोहोचलेले आमदार पुन्हा रिसॉर्टला रवाना

भोपाळ: मध्य प्रदेशमधलं सत्ता नाट्य अद्यापही सुरूच आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा काँग्रेसला रामराम, त्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनी दिलेले राजीनामे यामुळे राज्यातलं काँग्रेस सरकार अडचणीत सापडलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे आमदार भोपाळला परतण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. सिंधिया समर्थक १९ आमदार सध्या बंगळुरूतल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यांना मध्य प्रदेशात आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. आज हे आमदार भोपाळला परतण्यासाठी रिसॉर्टहून केम्पेगौडा विमानतळाच्या दिशेनं निघाले होते. मात्र तिथून ते पुन्हा रिसॉर्टवर परतले. या आमदारांना बंगळुरूहून आणण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र विमानतळाहून आमदार पुन्हा रिसॉर्टला गेल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला. सरकार वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसनं आमदारांना परत आणण्यासाठी भोपाळच्या राजा भोज विमानतळावर एका विशेष बसची व्यवस्था केली होती. मात्र हे आमदार बंगळुरूतल्या विमानतळावरूनच पुन्हा रिसॉर्टला परतल्यानं ही बसदेखील रिकामी परतली. मध्य प्रदेशात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. तशी माहिती त्यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक यांनाही कळवली आहे.ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी (१० मार्चला) त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिले. सिंधिया यांचे १९ समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. यातले सहा जण कमलनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र यातल्या एकाचाही राजीनामा मंजूर झालेला नाही.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा