शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान तुमचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदींचे चौकीदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:03 IST

नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असं सांगितलं नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात मी चौकीदार आहे मात्र ते कोणाचे चौकीदार आहेत हे जनतेला सांगत नाही. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या घराबाहेर चौकीदार बघितलाय का? बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर कधी चौकीदार बघितलाय का? मात्र अनिल अंबानी यांच्या घरी अनेक चौकीदार आहेत, त्याठिकाणी चौकीदारांची रांग लागलेली असते. नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असं सांगितलं नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. राहुल गांधी आज राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे प्रचारसभेत बोलत होते.


यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर लक्ष्य केले. आगामी निवडणूक ही दोन विचारांची लढाई आहे. एकीकडे देशात दुफळी माजवण्याचा विचार आहे तर दुसरीकडे बंधूभाव, प्रेम आणि लोकांना एकमेकांशी जोडण्याचा विचार आहे. मागील 5 वर्षापासून पंतप्रधान मोदी दोन भारत बनविण्याचा प्रयत्न करत आहे, एक खाजगी श्रीमंत लोकांचा तर दुसरा गरिब, शेतकरी आणि जवानांचे आहे. 
राहुल गांधी यावेळी म्हणाले की, भाजपाकडून अनेक आश्वासने दिली गेली, 15 लाख रुपये मिळाले नाही, 2 करोड नोकरी देण्याचं आश्वासनही पूर्ण नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही एवढचं काय तर जे तुम्ही बचत म्हणून साठवलेले पैसेही मोदी यांनी नोटाबंदी करुन तुमच्याकडून लुटले. ज्या लोकांना आम्ही गरिबीपासून मुक्त केले अशा लोकांना मोदी यांनी पाच वर्षात पुन्हा गरिब बनवले असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे सरकार जर सत्तेत आले तर भारतातील २० टक्के गरीबांच्या बँक खात्यात प्रतीवर्षी ७२,००० रुपये जमा करेल. म्हणजेच काँग्रेस ५ वर्षात ३,६०,००० रुपये गरीबांच्या बँक खात्यात जमा करुन दाखवेल असा विश्वासही राहुल गांधी यांनी जनतेला दिला.


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचा पहिला राजस्थान दौरा आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात देत काँग्रेसचं सरकार राजस्थानमध्ये आलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधून काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. राजस्थानात एकूण 25 लोकसभा मतदारसंघ आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थानElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानीNirav Modiनीरव मोदी