शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
4
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
5
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
6
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
7
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
8
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
9
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
10
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
11
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
12
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
13
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
14
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
15
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
16
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
17
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
18
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
19
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
20
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'मोदींवर वैयक्तिक टीका करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत'-ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 7:58 PM

'चौकीदार चोर है, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब, हे सगळे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विरोधात चालत नाहीत.'

Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. शुक्रवारी माध्यमाशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणतात, 'पीएम मोदींच्या कुटुंबावर भाष्य करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. मोदींवरील वैयक्तिक टीका विरोधकांनाच अडचणीत आणतात.' दरम्यान, अब्दुल्ला यांचा पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे.

अलीकडेच राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधानांच्या कुटुंबाबाबत टीका केली होती. याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'गेल्या निवडणुकीत 'चौकीदार चोर है'चा नारा देण्यात आला, तो विरोधकांवर उलटला. मी अशा घोषणांच्या बाजूने कधीच नव्हतो आणि या घोषणांमुळे आम्हाला कधीही फायदा झालेला नाही. अशा घोषणांमुळे विरोधकांचेच नुकसान होते. मतदारांना अशा घोषणांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना आज त्यांच्यासमोरील समस्या कशा सुटतील, हे जाणून घ्यायचे आहे.' 

लालू यादव यांनी पंतप्रधानांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'त्या वक्तव्यावरुन आम्हीच त्यांना ओपन गोल पोस्ट दिला आहे. आता ते या संधीचा फायदा घेत आहेत. याचे उत्तर आता आमच्याकडे नाही. मी एवढेच म्हणेन की, आपण असे वैयक्तिक राजकारण करू नये, तर जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत. चौकीदार, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब- हे सगळे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या विरोधात चालत नाहीत.'

'मोदींच्या भाषणात काहीच नवीन नव्हते'यावेळी अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदींच्या श्रीनगरमधील भाषणावरही टीका केली. 'पंतप्रधानांच्या भाषणात नवीन काहीच नव्हते. ज्या गोष्टींबद्दल ते नेहमी बोलतात, त्याच गोष्टी पंतप्रधानांनी बोलल्या. लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधानांनीही काहीही स्पष्ट केलेले नाही. पंतप्रधान मोदी स्वत: निवडणुकीची घोषणा करू शकत नसले तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या 31 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी विधानसभा निवडणुका घेण्याबाबत त्यांनी निश्चितपणे माहिती द्यायला हवी होती. मुदतीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे त्यांनी जनतेला सांगायला हवे होते. पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याबद्दल सांगायला हवे होते. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार पॅकेज जाहीर करायला हवे होते. पण पंतप्रधान यापैकी एकाही मुद्द्यावर बोलले नाहीत,' अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOmar Abdullahउमर अब्दुल्लाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी